तळोदा /नंदुरबार -१६/७/२३
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३व्या संजीवन समाधी सोहळानिमित्ताने क्षत्रिय अहिर शिंपी समाजाकडून तळोदा शहरात पालखी मिरवणुक काढण्यात आली.
मेन रोडवरील हनुमान मंदिरापासुन पालखीस सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांची प्रतिमा सजावट करण्यात आली होती. शिंपी समाजातील पुरुष – महीला,लहान मुले सामील झाले होते. पालखी मिरवणुकीत भजनी मंडळ अग्रस्थानी होते. भक्ती गीते तसेच समाजातील महिला ठिकठिकाणी गरबा नृत्य करून संत नामदेव महाराजांचा जयघोष करीत होते.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉबअपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे हि वाचा :Nandurbar… अर्हत प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक क्रीडा सप्ताहाचे जल्लोषात पारितोषिक वितरण
NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..
शिंपी समाज अध्यक्ष सुपडू भांडारकर, सचिव लक्ष्मीकांत बोरसे, महिला मंडळ अध्यक्ष पुनम करनकाळ, महिला सचिव सीमा पवार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा करीत सकाळून तळोदा शहराच्या मेनरोडवरून पालखी मिरवणुक सोहळा तसेच दुपारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम व सत्कार समारंभ पार पाडला.स्नेहभोजनाचे अन्नदाते अरुण करनकाळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मनस्वी चित्ते या विद्यार्थिनीने दहावीत घवघवीत यश संपादन करीत प्रथम क्रमांक पटकावल्याने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिंपी समाजातील मंडळाचे सचिव लक्ष्मीकांत बोरसे, मनोज इसई, पंकज बोरसे, चंद्रकांत पवार, अनिल भांडारकर, राजेश भांडारकर,किरण जगदाळे, विनायक इसई,सचिन इसई यांनी परिश्रम घेतले.
नितीन गरुड ,तळोदा तालुका प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार