प्रकाशा :- शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र या ठिकाणी संगमेश्वर महादेव मंदिर असून या ठिकाणी तीन नद्यांच्या संगम आहे. आज सूर्यकन्या तापी नदीच्या जन्मोत्सवनिमित्त भाविकांकडून अडीचशे मीटरची अखंड साडी अर्पण करण्यात आली.
केदारेश्वर महादेव मंदिराचा सभामंडपात सूर्यकन्या तापी मातेची मूर्ती आहे. या ठिकाणी दर्शनासाठी व पूजा विधीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच
सूर्यकन्या तापी नदी ही जीवनदायी म्हणून ओळखली जाते. तापी नदी ही तीन राज्यातून वाहत अरबी समुद्रात जाऊन मिळते.
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आज सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव होता. त्यानिमित्त प्रकाशा येथील सद्गुरु दगाजी महाराज धर्मशाळेचे चेअरमन मोहन चौधरी, संचालक विश्वास पाटील, लड्डू पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. तसेच गढी मधील सती दत्ती माता महिला मंडळ यांच्या वतीने देखील तापी किनारी बसून ब्रह्मरुंदांकडून पूजा विधी करण्यात येऊन तापी मातेला साडी चोळी अर्पण करण्यात आली.
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW
या वेळेला प्रकाशा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अडीचशे मीटरची साडी होडीद्वारे तापी नदीचा पात्रात जाऊन व्यवस्थित रित्या अर्पण करण्यात आली.
यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी संगमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी पूजा करण्यात आली. पूजेला मोहन चौधरी, डॉ. रवींद्र चौधरी, चौधरी सुरेश, गणेश पाटील, दिलीप पाटील, विश्वास पाटील पूजेला बसले. तसेच गढी परिवारातील महिला मंडळ यांनी स्वतंत्र पूजा केली व साडीचोळी अर्पण केली. यावेळी पट्टीचे पोहणारे सिताराम भगत, आकाश झिंगाभोई, गणपत भील, पावभा गुरव आदींनी तापी नदीच्या पात्रात नावेद्वारे साडी वाहीली. ब्रह्मरुंद प्रदीप देशपांडे, छोटू उपासनी, महेंद्र उपासनी यांनी पूजा विधी केली.
नरेंद्र गुरव. एमडी.टीव्ही. न्युज, प्रकाशा.