शहादा : १४/३/२०२३
येत्या 14 मार्चपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा पवित्र घेतला..
मागणी आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून शहादा येथील प्रोटॉन शिक्षक संघटनेतर्फे नुकतं शहादा तहसीलदार यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं..
14 ते 18 मार्च दरम्यान ऑन ड्युटी पाच दिवस काळी पट्टी बांधून विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचा त्यात सांगण्यात आलं..
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासकीय नियम शासकीय आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचे धरणे आंदोलन व पाच दिवसाचे काळे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे..
पूर्वी लागू केलेली जुनी पेन्शन योजना पूर्ववत करा या प्रमुख मागणीसह सरकारी कर्मचारी बेमुदत संपाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले आहेत..
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्यामुळे अनेकांना माध्यमिक व उच्च शिक्षण घेण्यात दुरापास्त होणार आहे ते आता लागू करू नये..
विद्यापीठांना स्वायत्तता देऊन शिक्षणाचे मार्ग बंद करू नयेत..
तसंच फेलोशिप शिष्यवृत्ती या मागासवर्गीय बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना तात्काळ देऊन हा निधी वापरात आणावा या मागण्यांचा त्यात समावेश आहे..
तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार कल्पेश जाधव यांनी ते निवेदन स्वीकारलं..
प्रोटॉन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू जोंधळे, संजय निकुंबे ,अर्चना कुवर, धनराज साळवे ,मिलिंद महादू माणिक कालुसिंग पाडवी, निलेश ब्राह्मणे ,किरण साळवे ,युवराज महाले, पीसी बैसाणे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत…
संजय मोहिते शहादा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज