नंदुरबार : (Pulkit Singh) गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या दबंग कारवाईने अनेकांना धडकी भरविणाऱ्या परिविक्षाधीन सनदी अधिकारी तथा तहसीलदार पुलकित सिंह यांनी पुन्हा एकदा नंदुरबारात कारवाईच्या बडगा उगारलेला आहे.
आज मंगळवारी त्यांच्या पथकाने अवैद्य पाणी उपसा आणि अवैद्य गौण खनिजांवर कारवाई केली.
त्यांच्या या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
मागील दोन महिन्याभरापूर्वी पुलकित सिंह यांनी नंदुरबार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची धुरा सांभाळली होती. महिनाभराचा कालावधीत त्यांनी मोठमोठ्या कारवाया केल्याने ते अल्पावधीतच चर्चेत आले होते. अतिक्रमणांवरील कारवाईच्या बडग्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर गट विकास अधिकारी म्हणून अक्कलकुव्यात बनावट बियाणे विक्रेत्यांना कारवाईचा दणका दिला. नंदुरबार तहसीलदार पदाच्या कार्यभार स्वीकारल्यानंतर आठ दिवस झाले आता त्यांनी कारवायांना सुरुवात केलेली आहे. आज मंगळवारी सकाळपासूनच त्यांनी कारवाईच्या सपाटा सुरू केला.अवैद्य पाणी उपसा करणाऱ्यांचे कनेक्शन त्यांनी कट केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पुढील मोर्चा अवैद्य गौण खनिज करणाऱ्यांकडे वळविला. नंदुरबार शहरासह विविध कॉलनीमध्ये ज्या ज्या ठिकाणी वाळूच्या साठा करून ठेवला आहे अशा ठिकाणी देखील त्यांनी भेट देत कारवाई केली.
वाघोदा शिवारात चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या पुढे परीविक्षाधीन सनदी अधिकारी पुलकितसिंह यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली.काही वेळानंतर वाळूने भरलेला डंपर रस्त्यावरून जात असताना वाहनाला अडवण्यात वाहनाची स्वतः पुलकित सिंह यांनी तपासणी केली. डंपर चालकाला पुलकित सिंह यांनी वाळू कुठून आणली? कुठे जात आहे? अशी विचारणा केली असता याची माहिती देखील व्यवस्थित सांगता येत नसल्याने संशय बळावल्याने वाहनावर कारवाई केली.यावेळी महसूल विभागातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
एमडीटीव्ही न्युज ब्यूरो, नंदुरबार .