शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तेलंगणा पॅटर्नची गरज

0
143

उत्तर महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांचा भारत राष्ट्र समितीत प्रवेश : मुख्यमंत्री राव यांची कार्यकर्त्यांसोबत चर्चा

6e877c9e 0756 4a75 9c55 0f2520d945e4

भडगाव : – उत्तर महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यात एक आदर्श मॉडेल तयार करून देशभरात शेतकरी, कष्टकरी, दिन-दलित, आर्थिक मागास वर्ग अशा सर्व घटकांचा विकास करत अवघ्या काही वर्षात राज्याचा कायापालट केला आहे. भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्रातील सुरु असलेली घोडदौड याबाबत चर्चा केली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव कदम यांच्या उपस्थितीत व उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद येथे भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते डॉ. लक्ष्मण साबळे, भारत राष्ट्र समितीचे नाशिक जिल्हा समन्वयक सचिन कड, प्रा. मुकुंद आहेर, राम निकम, वैभव देशमुख, चंद्रकांत बच्छाव, सोमनाथ बोराडे, बिलाल शेख यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील नितिन तायडे, भिकन सोनवणे, निलेश महाजन, सोनु पाटील, लक्ष्मण सांगोरे यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

के.चंद्रशेखर राव यांनी डॉ. लक्ष्मण साबळे यांच्यासह कार्यकर्त्यांसोबत नाशिक जिल्हातील विविध समस्यांवर चर्चा केली. महाराष्ट्रात नैसर्गिक संसाधनांची मुबलक उपलब्धता असताना केवळ दिशाहीन राजकीय नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. अवघ्या ८ / ९ वर्षात तेलंगणा राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त झाले आहे. अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्यामुळे तेलंगणाची जनता समाधानी असल्याचे के.चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

सतीश पाटील, एम.डी.टी.व्ही. न्युज, भडगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here