BREAKING : ठाकरे जिंकले … अखेर झाला निर्णय

0
280

मुंबई -२७/६/२३

मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई विरोधात, शिंदे सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला. ठाकरे गट आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ०१ जुलै रोजी विराट मोर्चा काढणार आहे. मात्र मोर्चाच्या मार्गावरुन गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी चर्चा करुन या मोर्चाला परवानगी दिली आहे.

 WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पालिकेच्या समोरून हा मोर्चा जाणार आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकित हा तोडगा काढण्यात आला आहे. पोलीस आणि ठाकरे गटात आज बैठक झाली आहे.
सुरूवातीला ठाकरे गटाचा मोर्चा मेट्रो सिनेमा ते महापालिकेच्या बाजूला टाइम्स ऑफ इंडियाची इमारत आहे. त्याठिकाणी मोर्चा होता. परंतू कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती.

दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्यांनी आझाद मैदान निश्चित केले. आहे. ठाकरे गटाचा मोर्चा आता मेट्रो सिनेमा ते महापालिकेच्या बाजूला असलेले आझाद मैदानापर्यंत असणार आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here