दिल्ली -८/६/२३
इतके अनर्थ एका अविद्येने केले…
सर्व समस्यांचे मूळ अज्ञान आहे, हे सांगणारा क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचा हा महान विचार दिल्लीतले पोलीस कर्मचारी थानसिंग यांनी जणू कोळून प्यायला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
गेल्या ६ वर्षांपासून ते आपली नोकरी सांभाळून दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील गरीब घरांतील शाळाबाह्य मुलांना शिकविण्याचे काम करत आहेत,
तेही पूर्णपणे मोफत.
उद्देश एकच, शिक्षणाअभावी ही मुले भरकटू नयेत
आणि त्यांचे भवितव्य सावरावे! विशेष म्हणजे या “थानसिंग कि पाठशाला” मध्ये मुलांनाही शिक्षणाची चांगली गोडी लागली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देखील महात्मा ज्योतीरावांच्या साथीने वंचितांच्या शिक्षणासाठी आपलं अवघं जीवन वाहून घेतलं होतं.
अगदी त्याप्रमाणेच थानसिंग यांचं हे कार्य आहे.
त्यांनी घेतलेल्या या विधायक पुढाकाराचं मनापासून कौतुक वाटतंय!
आज अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर लहान -मोठे व्यवसाय करतात आणि दोन वेळचं आपल्या कुटुंबाचं पोट भरतात ..
आज दिल्लीत हे पोलीस कर्मचारी वेळात वेळ काढून महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या विचारांना पुढं नेण्याचं अव्याहतपणे काम करताय ..
एम डी टी व्हीचा त्यांना आणि त्यांच्या या कार्याला सलाम !
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,नवी दिल्ली ..