GOOD NEWS…शिंदखेड्याच्या “त्या” तरुणाला मुख्यमंत्रांकडून शाब्बासकी… ५ लाखाचे बक्षीस देऊन केला गौरव !

0
256

शिंदखेडा :- पुण्यातील नेहमीप्रमाणे गजबजलेली सदाशिव पेठ…एकतर्फी प्रेमातून एक माथेफिरू हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग करतोय… जीव वाचविण्यासाठी आकांताने तरुण पळते… माथेफिरूने हातातील कोयत्याने तिच्या मानेवरील केलेला वार खांद्यावर बसून तरुणी जखमी होते… रस्त्याच्या दोन्ही कडेला अनेकजण उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहतात… जखमी तरुणीवर दुसरा वार करणार तोच दोन जिगरबाज तरुण माथेफिरूच्या मुसक्या आवळत तरुणीचा जीव वाचवतात… त्या माथेफिरुला पोलिसांच्या स्वाधीन करतात..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील शूटिंग तर नाही ना..? असे अनेकांना वाटते खरे मात्र थोडक्यात जीव वाचल्याच्या आकांताने रडणाऱ्या तरुणीची आपबिती घटनेचे गांभीर्य सांगून जाते आणि बघणारे या दोन्ही तरुणाचे कौतुक करतात. जर हे तरुण नसते तर …? या विचाराने अनेकांची धडकी भरते. या दोन्ही तरुणांच्या बहादूरिचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. याची दखल चक्क राज्याचे मुखमंत्री घेतात आणि या तरुणाच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत ५ लाखाचे बक्षीसही देतात. यातील एक तरुण उत्तर महाराष्ट्र्रातील शिंदखेड्याच्या असल्याने त्याने दाखविलेल्या जिगरबाज कामामुळे अक्ख्या खान्देशवासियांना अभिमान वाटतो.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पुण्यातील गजबजलेल्या सदाशिव पेठ मध्ये एका माथेफिरूने दिवसाढवळ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला चढविला. यावेळी अनेकांनी बघ्याची भुमिका घेतली. मात्र हर्षद पाटील व लेशपाल जवळगे या दोन जिगरबाज तरुणांनी जिवाची परवा न करता तरुणीला वाचविले शिवाय त्या माथेफिरूला पकडून दिले. म्हणून दोन्ही जिगरबाज तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन्ही तरुणांना ५१ हजार रुपयेचे बक्षीस जाहीर केले होते. यांची कामगिरी पाहुन महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दोघांना प्रत्येकी ५ लाखाचे बक्षीस घोषित केले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

विशेष म्हणजे हर्षद पाटील हा शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणेचा रहिवासी आहे. तो येथील कापसाचे व्यापारी मच्छिंद्र पाटील यांचा लहान चिरंजीव आहे. हर्षद हा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांचेसह अनेकांनी फेसबुक वर लाईक शेअर करत धाडसाबद्दल हर्षदचे कौतुक केले आहे. संकटसमयी काहीही न पाहता कोणत्याही व्यक्तीच्या मदतीला धावुन जाणे.आपल्या रक्तातच असुन हा मातीचा सर्वात चांगला गुण आहे, हे हर्षदच्या कृत्याने दाखवुन दिले आहे, असे आ.रावल यांनी हर्षद पाटीलला शाबासकी दिली. एकंदरीत हर्षद च्या धाडसाने शिंदखेडा तालुका वासियांची मान निश्चितच उंचावली आहे.

✍🏻 यादवराव सावंत. एमडी.टीव्ही. न्यूज शिंदखेडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here