नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २४ वा वर्धापनदिन उत्साहात..

0
153

नाशिक -१०/६/२३

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा – माजी खासदार समीर भुजबळ

महापुरुषांचा इतिहास बदलला जातोय, विरोधकांवर सूड बुद्धीने कारवाई होतेय, याविरुद्ध आपल्याला लढायचं – समीर भुजबळ

आज मात्र देशातील कामगार, शेतकरी, शेतमजूर व सर्वसमान्य नागरिक अडचणीत आला असून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नाशिक राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या २४ वा वर्धापन दिन व रौप्य महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

nashikncpbday 1
1
nashikncpbday 2
2
nashikncp bday 1
3
nashikncp bday 2
4
nashikncp bday 4
5

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, दि.२० मे १९९९ रोजी पवार साहेब काँग्रेस मधून बाहेर पडले. त्यांच्या सोबत सर्वात प्रथम छगन भुजबळ साहेब कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडले. पवार साहेब दिल्लीतून मुंबईत आले

त्यावेळी त्यांचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. पक्षाचे नाव काय याबाबत दोन दिवस चर्चा झाली. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव निश्चित झालं. त्यानंतर १० जून १९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली.

हे सुध्दा वाचा:

BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

केवळ वीस दिवसाच्या काळात सर्व तयारी केली यामध्ये मी स्वतः नियोजनात होतो. पक्षाचे चिन्ह निर्मिती, झेंडा, घटना निर्मिती तसेच नागरिकांची नोंदणी करण्याबाबत सर्व जबाबदारी आपण पार पाडत होतो. माझगाव येथील सहकाऱ्यांना सोबत घेऊन माझगाव येथून नागरिकांची नोंदणी व इतर आवश्यक कागदपत्रे व दस्ताऐवज तयार करण्यात आले असल्याचे त्यानी सांगितले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पक्षस्थापनेनंतर अवघ्या दोन महिन्या पक्ष सत्तेत आला या आठवणीना त्यांनी उजाळा दिला. तसेच गेली २५ वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा पक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

चुकीची माहिती पसरवून महापुरुषांची बदनामी सुरु आहे. देशात आणि राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सूड बुद्धीने कारवाई करून अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वरिष्ठ नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.

हे सुध्दा वाचा:

BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

याविरोधात आपल्याला लढा देण्याची गरज आहे. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार आपल्याला निवडून देऊन पवार साहेबांचे हात अधिक बळकट करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार सरोज आहिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना धनादेश वाटप:

नाशिक शहरात कार्यरत असणाऱ्या ह्युमन बिंग फाऊंडेशनच्या वतीने १२ वीत शिक्षणाऱ्या दोन अनाथ मुलांची शालेय फी भरण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीचे धनादेश माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले.

याप्रसंगी संजय खैरनार, अकील खान, सोहेल काझी, रामेश्वर साबळे, विनय पांडे, रझा खान, आजम बरकती, अब्दुलनबी खान व ह्युमन बिंग फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा:

BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

यावेळी आमदार सरोज आहिरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार अपूर्व हिरे, विष्णूपंत म्हैसधूने,प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे, मधुकर मौले, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, संजय खैरनार, समाधान जेजूरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, ऐश्वर्या गायकवाड, दिलीप नलावडे, सुरेश आव्हाड, धनंजय राहणे, मनिष रावल, जगदीश पवार, कविता कर्डक, समिना मेमन, सुषमा पगारे, बाळासाहेब गीते, सुरेख निमसे, मनोहर कोरडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here