भरधाव दुचाकी घसरली ; तरुणाचा मृत्यू

0
158

नंदुरबार : २३/३/२३

भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकी चालक तरुणाचा मृत्यू झाला. तर या अपघातात एकजण जखमी झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील मालिआंबा गावाजवळ घडली आहे.

अक्कलकुवा शहरातील रहिवासी अदनान रऊफ बलोच (वय २३) हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवर (क्र.एम.एच.१८ वाय ८०४१) त्याचा मित्र मतलुब बदरुल अमान (वय १९) बसवून डाब येथून अक्कलकुवा येथे होते.

यावेळी अदनान बलोच याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने मालीआंबा गावजवळील रस्त्यावर दुचाकी घसरल्याने अपघात घडला.

घडलेल्या अपघातात अदनान बलोच या तरुणाचा मृत्यू झाला.

तर मतलुब अमान यांनाही दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले.

याबाबत मतलुब अमान यांच्या खबरीवरून मोलगी पोलिस ठाण्यात मयत अदनान बलोच याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here