उरुसासाठी जमलेला गर्दीत उधळला वळू ..

0
163

उस्मानाबादमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. उरुसामध्ये वळू उधळल्यानं 14 भाविक जखमी झाले आहेत.

जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेवेळी जवळपास 15 हजार भाविक उपस्थित होते. उरूस सुरू असताना अचानक वळू भाविकांमध्ये शिरला. या घटनेमुळे भाविकांची धावपळ उडाली.

यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 14 भाविक जखमी झाले आहेत. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.पाहू या हा व्हिडिओ

उस्मानाबाद शहरात सध्या हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा उरूस सुरू आहे. उरुसामध्ये सुरू असलेल्या धार्मिक कर्यक्रमाला तब्बल 15 हजार लोकांची उपस्थिती होती. धार्मिक कार्यक्रम सुरू असताना पहाटे तीनच्या सुमारास अचानक एक अनियंत्रीत झालेल्या वळू भाविकांमध्ये शिरला.

वळू उधळल्यानं भाविकांची धावपळ उडाली. यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 14 भाविक जखमी झाले आहेत. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उस्मानाबादहून एम डी टी व्ही न्यूज ब्युरो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here