तळोदा -३०/५/२३
स्वच्छ भारत मिशन योजना शहरात राबविण्यात यावी असे आदेश शासनाने पारित केले
कोट्यावधींचा निधी त्यासाठी वितरित करण्यात आला
शहरातील गटारी नालेसफाई पावसाळ्याच्या आधी स्वच्छ करण्याची तसदी सुद्धा प्रशासन घेत नाही याला नेमकं तरी काय म्हणावं..
हा निधी जातोय कुठे?
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ही योजना कागदावर, नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर हेच म्हणायची आता वेळ आली आहे का तळोदावासीयांना
मान्सून सुरू होण्यापूर्वी शहरातील गटारी व नालेसफाई त्वरित व्हावी या संदर्भातला निवेदन शहरातील काही सामाजिक कर्त्यांनी तळोदा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर केलं
निवेदनातून नालेसफाई व गटारी साफसफाई करण्याची मागणी लावून धरली
पण प्रशासन कोणाच्या आदेशाची वाट बघतोय अशी आपसूक चर्चा सामाजिक कार्यकर्त्यांमधून व्यक्त होते..
गटारी आणि नालेसफाईकडे पूर्णतः पालिकेचे दुर्लक्ष होत असून गटारी तुडुंब भरून वाहत आहे
वर्दयीच्या रस्त्यांवर गटारीचे पाणी वाहू लागल्याने रस्त्यातून वाट कशी काढायची असा प्रश्न आता नागरिकांना निर्माण होऊ लागलाय
तुडुंब भरलेल्या गटारी आणि नाले सर्वत्र दिसू लागल्याने आता घाणीचं माहेर घर तळोदा शहर होतंय का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय
नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून त्वरित नालेसफाई न झाल्यास तळोदा नगरपालिकेला सामाजिक कार्यकर्त्यांनी जाब विचारत अप्रत्यक्ष इशारा दिलाय
लोकांच्या आरोग्याशी खेळू नका, नगरपालिकेतील सत्ताधीशांनी जरा रस्त्यावर फिरा मग कळेल वास्तव काय ते?
लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका अन्यथा उद्रेक होईल असा अप्रत्यक्ष इशारा निवेदनाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता यांनी दिलाय
या निवेदनावर तळोदा शहरातील चंद्रकांत भोई शिवदास भोई जगदीश भोई, मयूर ढोले सचिन तावडे नीरज रामोळे संदीप कुंभार संतोष वानखेडे धनराज भोई गणेश शिंदे भरत सोनवणे आदींच्या सह्या आहेत.. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपालिकेला प्रोत्साहन मिळत असले तरी ते प्रोत्साहन नावाला कागदावरच प्रत्यक्षात कार्यवाही शून्य? एवढी उदासीनता प्रशासनाची आणि पालिकेची कशी काय असू शकते याचं आश्चर्य सर्वांनाच वाटू नये ते नवलच..
या बातमीतून तळोदा प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्वरित गटारी आणि नालेसफाई करावी हीच अपेक्षा..
या बातमीसाठी तळोदा ग्रामीण प्रतिनिधी, नितीन गरुड ,एम डी टी व्ही न्यूज