शिशुविहारच्या चिमुकल्यांचा सांस्कृतिक कलाविष्कार ठरला आकर्षणाचं केंद्रबिंदू…

0
491

: .. सांस्कृतिक दर्शन घडवलं शिशुविहार मराठी माध्यमाच्या चिमुकल्यांनी..

नाशिक:२०/०२/२३

  • शॉर्ट हेडलाईन
  • 1.भोसला मिलिटरी स्कूलच्या डॉक्टर मुंजे हॉलमध्ये संपन्न झाला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा
    2 दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी केलं कार्यक्रमाचं उद्घाटन
    3 विद्यार्थ्यांनी दाखवले विविध सांस्कृतिक कला गुण…
    4 पालकांनो ,मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा : मान्यवरांचा सूर..
    5 बालगीते,पथनाट्य, समूहनृत्य या कला प्रकारांचा होता समावेश

खरोखर रम्य ते बालपण असं म्हणतात ना ते काही चुकीचं नाही.. लहानपणी वाटतं मोठं असावं, आणि मोठं झालं की वाटतं लहान व्हावं.. अशीच मोठ्यांसोबत घालवलेली शुक्रवारची संध्याकाळ लहानांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची..

ही संध्याकाळ अधिकच रंगत गेली जशी जशी या चिमुकल्यांनी आपला सांस्कृतिक कलाविष्कार करायला सुरुवात केली.. प्रचिती आली ती नाशिकच्या शिशुविहार मराठी माध्यमाच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून..

मराठी माध्यमाच्या शाळा आणि त्याकडे बघण्याचा समाजातला दृष्टिकोन तसा नकारात्मकच, कारण पालकांची ओढ आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे..

परंतु नाशिकच्या सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या शिशुविहार मराठी विभागाच्या शाळेनं ही बाब खोडून काढली.. असा बहारदार सांस्कृतिक कलाविष्कार पहावयास मिळाला आणि उपस्थित मान्यवरांसह पालकांनी टाळ्यांचा उदंड प्रतिसाद दिला..

प्रत्येक कार्यक्रम संपल्यावर टाळ्यांच्या रूपाने मिळालेली उपस्थितांची दाद काही वेगळं सांगून गेली.. मराठी माध्यमातली ही लहान मुलं अन्य मुलांच्याही बरोबरीने वागू शकतात, खेळू शकतात,नाचू शकतात हे सिद्ध केलं..

या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट चे संचालक निखिल मुळे लाभले होते..

तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे नाशिक विभागाचे कार्यवाह सी एम ए हेमंत देशपांडे, सहकार्यवाह नितीन गर्गे, कोषाध्यक्ष शितल देशपांडे, आसावरी धर्माधिकारी अध्यक्षा शिशुविहार मराठी माध्यम विभाग , वैशाली भट विभाग प्रमुख शिशुविहार, मराठी माध्यम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .तसेच मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित पालकांना हेमंत देशपांडे सर कार्यवाह सी एच एम ई सोसायटी यांनी मार्गदर्शन केलं.. ऐकूया सर काय म्हणालेत..

उपस्थित पालकांना मार्गदर्शन करतांना श्री. हेमंत देशपांडे सर, कार्यवाह सी एच एम ई सोसायटी,नाशिक विभाग

यानंतर विविध बालगीतांवर नर्सरी ते छोटा गट, मोठा गट यामधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कलाविष्कार सादर केला.. पाहूया याची एक झलक..

”या वाऱ्याच्या बसुनी विमानी सहल करु या गगनाची,
चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची ”या गीतावर बहारदार सामूहिक नृत्य सादर करतांना ..

शेवटपर्यंत रंगलेला हा स्नेहसंमेलन सोहळा अधिकच रंगतदार ठरला. या संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन शिशुविहार मराठी माध्यमाच्या अध्यक्षा आसावरी धर्माधिकारी यांचं लाभलं होतं. विभाग प्रमुख वैशाली भट यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका स्वाती काळे, प्राजक्ता देशपांडे, माधवी पोळ, शिल्पा रिसबूड, पल्लवी कजवाडकर, कल्पना डमाळे, शितल रोहणकर, इंदिरा उपासनी, अनघा भानोसे, आदित्य माताडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी सरला गीते, शितल गागरे, अनिता भोई आदींनी विशेष परिश्रम घेतले होते.

आपल्या अमोघ वाणीतून आणि बहारदार शैलीतून सूत्रसंचालन सौ.रूद्राणी संत यांनी केलं होतं.वार्षिक अहवाल वाचन अनघा भानोसे यांनी केले.
तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज नाशिक

photo of tejas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here