” या ” खासदारांची बोलावली मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक ..

0
198

मुंबई :१२/३/२०२३

राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निवडणुकींच्या चर्चांना वेग आला आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांनी तातडीने बैठक बोलावली आहे. तसंच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगाबाबत चर्चाही या बैठकीत होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना खासदारांची तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक सकाळी 10 वाजता होणार आहे. मात्र, या बैठकीतील विषय मात्र अद्याप अस्पष्ट आहे

या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनिती आखली जाणार असल्याचे कळते. तसंच मतदार संघातील प्रलंबित काम याचा आढावा घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे

त्याच बरोबर सुप्रीम कोर्टातील निकाल आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आणलेल्या हक्कभंग राज्यसभेत त्यावर हरकतीबाबतही चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो .. मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here