मुख्यमंत्री सचिवालय कक्ष ठरतोय ग्रामीण भागातील जनतेसाठी मंत्रालय आणि प्रशासनातील दुवा …

0
143

नंदुरबार :२४/२/२०२३

सर्वसामान्य जनतेला आपलं भाग सोडून मुंबई गाठावा लागतं..

तेही काही फायली असतील फायलिंग संदर्भातली काम असतील यासाठी प्रशासकीय कामांसाठी मंत्रालयाला धाव घ्यावी लागते..

उठा रेटा होतोच.. पण तारेवरची कसरत होते जेव्हा मंत्रालयातून काम न झाल्यावर माघारी फिरावं लागतं..

अशातच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष अर्थात सीएमओ प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने सुरू झालेला हा कक्ष आणि या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट तक्रारी पोहोचू शकतात..

नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देखील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलाय.

नुकतंच या माध्यमातून 35 तक्रारी प्राप्त झाल्या जिल्हास्तरावरील आठ तक्रारी सोडवण्यात आले आहेत.

राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.. त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील लोकांचे प्रमाण मंत्रालयात जाण्याचं आणि मुंबईत जाण्याचं सर्वाधिक आहे..

त्यांचे खेटे वाचवण्याचा प्रयत्न सरकारने केलाय.
*महिनाभरात पन्नास तक्रारी
गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत या पक्षाकडे 35 तक्रारी आल्या असून कक्षाशी निगडित तेरा तर स्थानिक स्तरावरील 22 तक्रारींचा समावेश आहे. जिल्हा परिषद महसूल पोलीस विभागाशी या निगडित आहेत.
*25 तक्रारी निकाली
कक्षाकडे दाखल झालेल्या स्थानिक 22 पैकी आठ तक्रारी निकाली काढण्यात आल्या.

तर उर्वरित 14 तक्रारी देखील लवकरच निकाली निघतील यासाठी पाठपुरावा करण्यात येतोय.
*जाणून घेऊया काय आहे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष?
लोकाभिमुक्त, पारदर्शकता व गतिमानता येण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला.

नागरिकांची निवेदने व अर्ज थेट या कक्षात आता देता येणार.
*डिसेंबर मध्ये झाला सुरू कक्ष..
20 डिसेंबर 2022 पासून हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला.

सध्या करमणूक कर शाखेच्या कार्यालयात कार्यरत आहे.

नंदुरबार जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे हे या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहत आहे.
तक्रारींचं स्वरूप नेमकं काय?
या कक्षाकडे शासकीय ,निमशासकीय अधिकारी ,कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक तसेच अर्धन्यायिक स्वरूपाची कार्यवाही अपेक्षित असलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं.
त्यामुळे या वृत्ताच्या माध्यमातून नेमकं मुख्यमंत्री सचिवालय कक्ष काय आणि नेमकं काय काम करतो हे सर्व वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी जनहितार्थ आम्ही देत आहोत..

या माध्यमातून प्रत्येकाने त्याचा उपयोग करून घ्यावा आणि अजून देखील अनेक ग्रामीण भागातील जनतेला मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नेमकं काय काम करतो हे कळावं हा यामागील उद्देश..
एम.डी.टी.व्ही न्यूज ब्युरो नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here