नाशिकच्या रामकुंडावर राजकीय नेते अभिनेते आपल्या नातेवाईकांच्या अस्थि विसर्जनासाठी कायम येत असतात तसेच देशभरातून अनेक भाविक धार्मिक विधीसाठी नाशकात येतात.. मात्र याच रामकुंडावर अस्थि विसर्जनाचे विदारक दृश्य समोर आलंय..
नाशिक शहर हे धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं.. देशभरातून लाखो भाविक नाशिक नगरीत पर्यटनासह धार्मिक विधीसाठी कायम येतात.. रामकुंडात अस्थि विसर्जन करणे हा देशभरातील भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून देशभरातील भाविक तथा नागरिक रामकुंडावर अस्थि विसर्जनाला येत असतात मात्र सद्यस्थितीत स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त रामकुंड अस्थि विसर्जनाला हानी पोहोचल्याचे दिसून आलंय..
रामकुंडातील पाण्याचा प्रवाह थांबविण्यात आल्याने अस्थिविघटनाचा प्रश्न उपस्थित झालाय.. नदीपात्रात सिमेंट काँक्रिटी झाल्यानंतर कुंडात रासायनिक प्रक्रिया होत नाही. त्यामुळे अस्थींचे विघटन होत नाही. अस्थींचा खच साचलेला असतो. हे थांबायचं असेल तर रामकुंडातील काँक्रीट काढणे गरजेचे असल्याचं देवांग जानी यांनी म्हटलंय..
गोदाप्रेमी कार्यकर्ते देवांग जानी नाशिक यांची प्रतिक्रिया ..
या संपूर्ण धक्कादायक प्रकाराचा रामकुंडावरून आढावा घेतला आहे आमचे नाशिक प्रतिनिधी तेजस पुराणिक यांनी..
नाशिकची जीवन वाहिनी म्हणून गोदावरी नदीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालय. या गोदेच्या तीरावर नाशिक वसले असून पंचवटी गोदातीरी रामकुंड पाहायला मिळतं. या घटनेमुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचवली जात असल्याचं दिसून आलंय. लवकरात लवकर हा भाग काँक्रिटी मुक्त व्हावा हीच अपेक्षा..
नाशिकहून तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एमडीटीव्ही न्यूज नाशिक