राष्ट्रीय पँथर्स आघाडीचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न ..

0
337

पालघर -३/५/२३

सोमवार दिनांक 1 मे 2023 रोजी राष्ट्रीय पँथर्स आघाडीचा प्रथम वर्धापन दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चिंतामणी मंगल कार्यालय पालघर येथे मोठया दिमाख्यात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करण्यात आले.
संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष या नात्याने सन्माननीय संतोषजी कांबळे यांनी सभेच्या प्रास्तविकाचे वाचन करून सभेला सुरुवात केली.
सभेचे अध्यक्ष स्थान आयु अविश राऊत( संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय पँथर्स आघाडी तथा प्रवक्ता – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) यांनी भुषवले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषण केले . .
संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सुमनताई मानकर यांनी मनोगत व्यक्त केले ..

b2c46f86 7128 4501 afdd f41feebd688b
1
b0575c57 0d10 4d19 b466 6ce3eded4d14
2
e7494e7f 6b0a 40d4 b6a0 9174879d5822
3

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
जिल्हा अध्यक्ष विनायक जाधाव यांनी संघटनेची भविष्यातील घोडदौड व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाला दिला ..
संविधान संघटनेचे अध्यक्ष अरविंद गमरे साहेब यांनी संविधान व संविधानातील मूलभूत हक्क व अधिकार यावर मार्गदर्शन केले .
संघटनेचे पालघर जिल्हा युवा संपर्कप्रमुख ऍड. अजिंक्य म्हस्के यांनी देशातील विद्यमान परिस्थितीवर भाष्य करून संघटनेची पुढील घोडदौड व प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने मानाचा व सन्मानाचा आदर्श ग्राम पुरस्कार मौजे वरोर सिद्धार्थ नगर या गावाला देण्यात आला.
बहुजन समाजात सामाजिक शैक्षणिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कुणाल भोईर यांना आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
तर महाराष्ट्र शासनाचा क्रांतीजोती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजनजी गरुड यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याचा व बहुजन समाजातील उल्लेखनीय कार्य व आदर्श पाहता स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले ..
सदर कार्यक्रमात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा संघटक तथा वरिष्ठ कार्यकर्ते ,प्रदेश उपाध्यक्ष राहूल जाधव , प्रदेश उपाध्यक्ष तथा अध्यक्ष वआदिवासी विभाग महाराष्ट्र कमलाकर माळी , वरिष्ठ कार्यकर्ते जगदीश राऊत , बिंबेश जाधव , अरशद खान , भारत महाले , भावेश दिवेकर , चंद्रसेन ठाकूर , निलेश गायकवाड , उमेश कापसे , पालघर जिल्हा उपाध्यक्ष शिवप्रसाद कांबळे ,सुरेंद्र मोरे , प्रमुख सल्लागार अहमद खान , जिल्हा सचिव रमाकांत गायकवाड, वरिष्ठ महिला कार्यकर्ती मोहिनी जाधव , उपस्थित होते ..
प्रदेश उपाध्यक्षा तथा अल्पसंख्याक विभाग महिला अध्यक्षा वाहिदाताई शेख ,महिला जिल्हा अध्यक्ष विद्याताई मोरे , महिला जिल्हा उपाध्यक्ष भरतीताई राऊत , पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत , डहाणू तालुका अध्यक्ष जीभाऊ अहिरे , मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर धोंडगा , जिल्हा युवा कार्याध्यक्ष विशाल मोहने जिल्हा सल्लागार विंदेश कापसे, सदाशिव मोरे तसेच पालघर जिल्ह्यातील जव्हार , मोखाडा , पालघर , डहाणू , तलासरी वसई , वाडा , विक्रमगड या तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्कारमूर्ती राजनजी गरुड यांनी केले व कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.
ऋषिकेश जाधव ,पालघर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here