शासनाने कलाशिक्षकांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात

0
101

शिंदखेड्यात महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

a5c08a8e fe98 4e5b 91c6 891ee79e1fe7

शिंदखेडा — राज्यातील प्रत्येक प्राथमिक, माध्यमिक शाळा, शासकीय, खाजगी आश्रमशाळेत एक कलाशिक्षक पद भरती करावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघातर्फे शिंदखेडा तहसीलदाराना निवेदन देण्यात आले. यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष प्रल्हाद साळुंखे, सरचिटणीस प्रल्हाद शिंदे, सल्लागार सुनील महाले यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर.बी.सुर्यवंशी, सचिव आर.डी.सुर्यवंशी यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यासोबत मागण्यांबाबत चर्चा केली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

राज्यातील प्रत्येक प्राथमिक, माध्यमिक शाळा, शासकीय, खाजगी आश्रमशाळेत एक कलाशिक्षक पद भरती करावे, सदर कलाशिक्षकांना शासनाचे सर्व वेतन व भत्ते माध्यमिक शाळा संहिता नुसार पुर्ण वेतन देय असावे, राज्यातील अनेक कलाशिक्षकांनी जि.प. प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, खाजगी, शासनमान्य, अनुदानित विनाअनुदानित शाळेत कंत्राटी पद्धतीने अंशकालीन निदेशक तसेच शासनमान्य पुर्ण अनुदानित शाळेत फिक्स पेवर काम करणाऱ्या कलाशिक्षकांना प्राधान्य क्रमाने सेवेत कायम करून वेतन व भत्त्याचा लाभ मिळावा, सेवानिवृत्त कलाशिक्षकांच्या जागी इतर भाषा विषयाचे डी.एड.व बी.एड. शिक्षकांची पदे भरण्यात येवू नये, तशा शासनमान्यता देवु नयेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

कलाशिक्षकांच्या ए.टी.डी. व ए.एम. वेतनश्रेणी मान्यता प्रस्ताव तात्काळ संस्थाध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या कडून प्रस्ताव करण्याचे लिखीत आदेश शिक्षण संचालक पुणे यांनी काढुन अशा प्रस्तावांना विनाअट मंजुरीसाठी राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना आदेश द्यावेत, TAIT परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना सेवेत घेण्यात यावे, पुर्वी प्रमाणेच कलाशिक्षकांची कर्मचारी सुचीत स्वतंत्र विशेष पद दिसावेत. कलाशिक्षकांना कला, कार्यानुभव विषयाऐवजी इतर भाषा विषयाचे अध्यापन देवु नये, कार्यभार पुर्ण होत नसेल तर स्काऊट गाईड, भुगोल, इतिहास विषय अध्यापनास दयावा. वर्गशिक्षक पद देवु नये या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष आर.बी.सुर्यवंशी, उपाध्यक्ष एस.बी.चौधरी, सचिव आर.डी.सुर्यवंशी, सल्लागार ए.एम.बेहरे, के.आर.सुर्यवंशी, ए.के.सावंत, ए.यु.मराठे, एन.आर.सावंत, आर.एम.भामरे, डी.बी.सोनवणे, महेश बाविस्कर, वाय.डी.जोशी, वाय. यु. मन्सुरी आदी पदाधिकारीसह कलाशिक्षक उपस्थित होते.

यादवराव सावंत, एम.डी.टी.व्ही. न्युज शिंदखेडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here