पालकमंत्र्यांनी केलं शहादा ग्रामीण रुग्णालय इमारतीचे उद्घाटन..

0
181

नंदुरबार: २३/२/२३

शहादा ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून आता शहादा तालुक्यातील परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळणे सुकर होईल..

ते या आरोग्य रुग्णालयाच्या माध्यमातून.. मंत्री महोदयांनी त्याचं नुकतच उद्घाटन केलं.
शहादा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय नव्हतं..

त्यामुळे आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी शहादा उपजिल्हा रुग्णालयात धाव ग्रामीण भागातील लोकांना घ्यावी लागायची.. मात्र येण्याजाण्याचा त्रास त्यांचा आता कमी होणार..

या ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून शहादा तालुक्यातील परिसरातील ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना नागरिकांना या रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याची संधी मिळाली आहे..

त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

graminhospitalshahada 1

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी येत्या दोन वर्षात 200 पेक्षा अधिक आरोग्य उपकेंद्रे, 56 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 11 ग्रामीण रूग्णालयांची निर्मिती व टाटा इन्स्टिट्युटच्या मदतीने नर्मदा काठावरील गावांनी स्पीडबोटी च्या मदतीने आरोग्य सुविधा सुरू केली जाणार असून त्यासाठी आवश्यकता पडल्यास आदिवासी विकास विभागातून निधी उपलब्ध करून दिला जाईल.

या सर्व निर्माण होणाऱ्या आरोग्य सुविधांसह इतर सुविधांशी वाड्या-पाड्यातला माणूस जोडला जावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक वाड्या-पाड्यात आणि गावात बारमाही रस्त्यांची निर्मिती येत्या दोन वर्षात केली जाणार आहे. व आज उद्घाटन झालेल्या ग्रामीण रूग्णालयास लवकरच उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा दिला जाणार आहे.

त्याचबरोबर आदिवासी भागात प्रतीकुल परिस्थितीशी सामना करत आरोग्य सुविधा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्यकर्मी यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ देण्याचाही विचार सचिवस्तरावरील चर्चेत केला असल्याचे पालकमंत्री डॉ. गावित यांनी म्हटलंय.

प्रत्येक कार्यालयात फेस रिडिंगद्वारे होणार हजेरी

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी वाढविण्यासोबतच या भागातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात.

यासाठी प्रत्येक कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांची हजेरी वेळेत असणे गरजेचे आहे.

त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्या फेस रिडिंगद्वारे हजेरीचा राज्यातील आगळा वेगळा उपक्रम आपण जिल्ह्यात राबवणार असल्याचीही माहिती यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली.

कुपोषण नियंत्रणात बचतगटांचा सहभाग वाढवणार
डॉ. सुप्रिया गावित

जिल्ह्यातील कुपोषण व सिकलसेल आजाराच्या नियंत्रणात लवकरच महिला बचत गटांचा सहभाग वाढवून त्यासाठीच्या उपययोजना अधिक बळकट केल्या जाणार आहेत.

तसेच आज निर्माण झालेल्या शहादा ग्रामीण रूग्णालयाच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा अत्यंत कमीतकमी वेळेत स्थानिक व परिसरातील दुर्गम भागातील नागरिंकांना उपलब्ध होणार आहेत, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलंय.

नंदुरबार लोकसभेच्या खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, कृषी सभापती हेमलता शितोळे कांतीलाल टाटिया उपस्थित होते.
काय आहेत या रुग्णालयात सुविधा?
आपत्कालीन व एक्स-रे विभाग, रक्त तपासणी विभाग, प्रसूती गृहासारखी अद्यायावत सुविधा..
लवकरच तात्पुरत्या स्वरूपात कर्मचाऱ्यांची नियुक्ती येथे करण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं.
खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं..

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र वळवी डॉक्टर गोविंद शेल्टे यांच्यासह गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक परिसरातील नागरिक उपस्थित होते..
प्रवीण चव्हाणसह संजय मोहिते शहादा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज शहादा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here