तळोदा :१८/२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 रोहिदास पाटील नामक व्यक्तीचे हरवले होते पैशाचे पाकीट
2 बाजार समितीचे वॉचमन कृष्णा मराठे यांनी दाखवलं प्रसंगावधान
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बैलांचा आठवड्या बाजार भरला होता. त्या बाजारात पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथील रोहिदास पाटील यांचे पैशाचे पाकीट हरवले..
मात्र समितीचे वॉचमन कृष्णा मराठे यांना ते निदर्शनास आले.. ही बाब त्यांनी समितीचे सहाय्यक सचिव हेमंत चौधरी यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी त्वरित रोहिदास पाटील यांना मोबाईल वरून संपर्क साधला..
व ते पाकीट त्यांना सुखरूप सुपूर्त केले. त्या पाकिटात एकूण 82 हजार एवढी रक्कम होती. कोणाचाही पैसे लुबाडण्याचा मोह होतो, इतकी रक्कम पाकिटात पाहून, मात्र कृष्णा मराठे यांच्या प्रामाणिकपणाचं हे प्रतीक मानलं जातं की त्यांनी त्वरित संपर्क साधून समोरच्या व्यक्तीची हरवलेली वस्तू परत केली.
कोणताही आर्थिक लोभ न बाळगता त्यांनी स्वतः जवळ न ठेवता ते पैसे सुखरूप त्यांना परत दिले. आजच्या समाजात पैशासाठी भावा भावांमध्ये भांडण होतात, एकमेकांच्या जीवावर उठतात, तर पैशाच्या लोभापाई हत्येचा कट केला जातो मात्र या सगळ्या गोष्टींना फाटा दिला तो कृष्णा मराठे यांनी..
त्यामुळे त्यांचं कौतुक केलं तेवढं कमीच.. अशा दिलदार, प्रामाणिक माणसांची समाजाला आजही गरज आहे..
या समाजातून अजूनही प्रामाणिक हा गुण हरवलेला नाही हा आदर्श घालून दिला वॉचमन कृष्णा मराठे यांनी..
रोहिदास पाटील यांनी वॉचमन कृष्णा मराठी यांच्यासह सहाय्यक सचिव हेमंत चौधरी यांचे आभार मानले.. एम.डी.टीव्ही न्यूजचा कृष्णा मराठे यांना सलाम..
महेंद्र सूर्यवंशी, तळोदा तालुका प्रतिनिधी, एम.डी .टी.व्ही न्यूज, तळोदा