एक चूक आणि दोघांचाही शेवट..

0
216

मुंबई -१६/६/२३

ती म्हण आहे ना दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्यात स्वत:च पडला. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं. त्याने आपल्या बायकोला मारण्याचा कट रचला. यामध्ये त्याने आपल्या बायकोला तर संपवलं शिवाय त्याचा स्वत:चाही जीव गेला. खरंतर बायकोला मारताना त्यानं एक चूक केली, ज्यामुळे त्याचा देखील मृत्यू झाला आहे.

ही घटना मुरादाबादमधील बिलारी पोलीस स्टेशन हद्दीतील खानापूर गावातील आहे. मंगळवारी रात्री एक वाजता एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मिठी मारली. त्यानंतर त्याच्या पाठीत पिस्तुलाने गोळी झाडली. पण ती गोळी त्याच्या पत्नीसह त्याला ही लागली, ज्यामुळे त्या दोघांचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, मृत जोडप्याला एक मुलगी आणि तीन मुलगे असून ते आता आता अनाथ झाले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

108 रुग्णवाहिकेतून दोघांनाही उपचारासाठी बिलारी सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. MDTV NEWS

मोबाईल हरवण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद

वास्तविक, अनिक पाल पत्नी सुमन आणि त्यांच्या चार मुलांसोबत खानपूर शहरात राहत होते. अनिक मजूर म्हणून काम करायचा. मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पती-पत्नी दोघेही घरी असताना फोन हरवल्याने दोघांमध्ये वाद झाला.

भांडणानंतर अनिक पाल याने पत्नीला मिठी मारली. यानंतर त्याने पत्नीच्या पाठीवर पिस्तुलाने गोळी झाडली. तीच गोळी बायकोसह अनिकच्या ही छातीत जाऊन लागली, ज्यामुळे नवरा-बायको दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हे सगळं घडलं याची ग्वाही त्यांच्या मुलांनी दिली आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here