नंदुरबार : नुकताच रिलीज झालेला “द केरला स्टोरी” या मूवीला चांगली पसंती मिळत आहे. देशातील मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि धर्मांतरावर या सिनेमाची स्टोरी बनवण्यात आली आहे. यासाठी नंदुरबार शहरातील मावळा प्रतिष्ठान माळीवाडा या सामाजिक संस्थेकडून शहरातील १५० मुलींना “द केरला स्टोरी” हा सिनेमा फ्री मध्ये दाखवण्यात आला आहे.
या सिनेमात ज्याप्रमाणे स्टोरी दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुलींवर होणारे अन्याय अत्याचार कशाप्रकारे होत आहेत. यासाठी नंदुरबार शहरातील मुलींना हा सिनेमा दाखवण्यात आलेला आहे. मुलींनी कुठलाही भूलथापांना बळी पडू नये यासाठी हा सिनेमा दाखवण्याच्या उद्दिष्ट या सामाजिक संस्थाकडून करण्यात आला होता.
नंदुरबार शहरातील अमर सिनेमा गृहात या सिनेमाचं आयोजन करण्यात आलं होते. हा सिनेमा पाहण्यासाठी शहरातील महिला व तरुणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. मावळा प्रतिष्ठान माळीवाडा या सामाजीक संस्थेकडून एक हजारच्या वरती तरुणी व महिलांना हा सिनेमा दाखवण्याचा मानस केला आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार.