‘द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला सर्वाजनिक ठिकाणी फाशी द्या: जितेंद्र आव्हाड..

0
188

मुंबई – १०/५/२३

द केरळ स्टोरी चित्रपटावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. आता या वादात जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे.

द केरळ स्टोरी चित्रपटावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. हा चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच आता या वादात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात यावी असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले आव्हाड? 

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाच्या  निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात यावी असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

या चित्रपटामुळे केरळची प्रतिमा डागळली गेली सोबतच राज्यातील महिलांचा अपमान झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

आव्हाड एका वृत्तवाहिनिशी बोलताना म्हणाले की, या चित्रपटातून असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधून 32 हजार महिला बेपत्ता आहेत आणि त्यांनी इसीस जॉईन केलं आहे. पण खरा आकडा केवळ तीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

केरळ स्टोरी हा चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शीत झाला आहे.

या चित्रपटावरून चांगलाच वाद पेटला आहे. विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत.

आव्हाडांप्रमाणेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि एमआयएमचे प्रमुख ओवैसी यांनी देखील या चित्रपटावर जोरदार निशाणा साधला आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ..मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here