नंदुरबार : ४/३/२०२३
नंदुरबार जिल्ह्यात लॉन टेनिस मैदानाचे नूतनीकरण पोलीस मुख्यालयात नुकतंच झालं..
त्याचं अनावरण आणि उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी शेखर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं..
लॉन टेनिस मैदानाचे नूतनीकरण आणि सरसेनापती संताजी असे नामकरण केलेल्या फलकाचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते करण्यात आलं..
नामकरण केल्यानंतर स्वतः त्यांनी लॉन टेनिस खेळाचा आनंद इतर अधिकाऱ्यांसोबत लुटला..
पोलीस दल म्हटलं की सतत ड्युटी, त्यामुळे स्वतःच्या शारीरिक वृद्धीसाठी विकासासाठी अशा प्रकारचे मैदानी खेळ, विविध प्रकारचे खेळ पोलिसांच्या शारीरिक सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असतात..
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर निश्चितपणे पोलीस निरोगी राहू शकतात..
शक्य नसलं तरी आठवड्यातून एकदा तरी लॉन टेनिस खेळावं अस आवाहन बी.जी शेखर पाटील यांनी केलं.
श्रीयुत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय आवारात वृक्षारोपण करण्यात आलं..

तर त्यांच्या हस्ते फलक अनावरण देखील करण्यात आलं..
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या एकूणच कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं..
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख पी. आर. पाटील यांच्यासह विविध पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार यावेळी उपस्थित होते..
प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम.डी. टी.व्ही न्यूज