नंदुरबारातील साडेअकरा हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम
नंदुरबार : यावर्षी मार्च महिन्यात अवकाळी आणि गारपिटीने जिल्हाभरात रब्बी पिकांसह टरबूज, खरबूज, पपई, केळी या पिकांचे जवळपास साडेआठ हजारहून अधिक क्षेत्रात नुकसान झाले. यात ११ हजार ५४४ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र या शेतकऱ्याना नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम आहे. सरकार कधी नुकसान भरपाई देईल,
याकडे बळीराजा आस लावून बसला आहे. राज्यातील नेते परराज्यात वारी करीत असून मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्याना वाऱ्यावर सोडले काय ? अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मार्च महिन्यात अवकाळी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान केले. काढणीला आलेला गहू, हरभरा जमिनदोस्त झाला. कांदा पिकाचेही नुकसान झाले. तसेच खरबूज, टरबूज, पपई, केळी या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला होता तर आता रब्बी हंगामात तारले जाणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, अवकाळीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले.
मार्च महिन्यात तब्बल चार वेळेस अवकाळीने दस्तक दिली. यामध्ये गारपिटीने शेतकऱ्यांच्या संकटात आणखीनच भर घातली होती. यामुळे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील ११ हजार ५४४ शेतकऱ्यांचे सुमारे साडेआठ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाले. ६रोजी पुन्हा गारपिटीत ३५ शेतकऱ्यांचे सुमारे १२ हेक्टरवर नुकसान झाले. १७ मार्च रोजी पुन्हा गारपिट झाल्याने २८ शेतकऱ्यांचे १३६ हेक्टर क्षेत्र वाया गेले. तर १९ मार्च रोजी ६ हजार ६४४ शेतकऱ्यांचे ३ हजार ४८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ११ ते १२ कोटींच्या घरात आहे.
आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
ठाणेपाडा, आष्टे परिसरात गारांचाच पाऊस पडल्याने या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली होती. कृषी मंत्र्यांनी या भागात नुकसानग्रस्तांना दिलासा देत अधिवेशन सुरु असून याच कालावधीत शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार असल्याची घोेषणा केली होती. कृषी मंत्र्यांच्या या घोषणेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा धीर मिळाला होता. मात्र आता अधिवेशन संपून दोन आठवड्याहून अधिकचा कालावधी उलटला आहे. मात्र, तरीही शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार कधी? याची प्रतिक्षा कायम आहे.राज्यातील नेते उत्तरप्रदेशात वारी करीत असून मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्याना वाऱ्यावर सोडले काय ? अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
जीवन पाटील, कार्यकारी संपादक एमडीटीव्ही न्युज नंदुरबार