नंदुरबार :- नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.हिना विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठान नंदुरबारतर्फे दिनांक २४ ते २९ जून २०२३ दरम्यान “खासदार चषक” भव्य क्रीडा सप्ताहाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी केले आहे. यामुळे जिल्हाभरातील खेळाडूंना आठवडाभर विविध खेळांचा आनंद घेता येणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दि.२४ जून रोजी सकाळी ११ वाजता श्रॉफ हायस्कूल येथील साईबाबा हॉल येथे बुद्धिबळ स्पर्धेपासून करण्यात येणार आहे. उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खा.डॉ. हीना गावित तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.अध्यक्ष डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित, श्रॉफ हायस्कूलच्या प्राचार्य सौ.सुषमा शहा, उपप्राचार्य राजेश शहा आदी उपस्थित राहतील.
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS
दि.२५ जून रविवार रोजी सकाळी ११ वाजता एस.ए.मिशन हायस्कूल येथे १४ वर्षे मुले व १७ वर्षे मुली फुटबॉल स्पर्धा होईल. दि.२६ जून सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता जेनी पार्क, बाबा रिसॉर्ट समोर १४ वर्षे वयोगट मुले व मुली यांच्यासाठी बॉक्स क्रिकेट सिक्स साईड टूर्नामेंट होणार आहे. दि २९ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे कराटे तथा रोल बॉल स्केटिंग स्पर्धा तर दि.२९ जून शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता लाडकाना वाडी सिंधी कॉलनी नंदुरबार येथे जम्प रोप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS
वरील स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थी तथा खेळाडूंनी स्पर्धेचे संयोजक मीनल वळवी, संदीप साळुंखे, राजेश शहा, सेबीस्टन जयकर, डॉ. दिनेश बैसाणे, नंदू पाटील, रामा हटकर, योगेश कुंभार, किरण मिस्तरी, हर्षबोध बैसाने, संदीप खलाणे, विजय जगताप, डॉ.जितेंद्र भारद्वाज, सिद्धार्थ साळुंके आदींना संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक सुभाष पानपाटील यांनी केले आहे.
एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.