राष्ट्रीय पॅंथर आघाडीने दिला राज्यभरात आंदोलनाचा इशारा

0
158

पालघर-7/6/23

नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील तरुण अक्षय भालेराव ची हत्या करण्यात आली..
या प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत
भीम जयंती साजरी केल्यामुळे गावातील मराठा तरुणांनी एकत्र येत अक्षयची हत्या केल्याचा आरोप अक्षयच्या कुटुंबीयांनी केलाय
ही घटना म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचीच आहे
अज्ञात समाजकंटक आणि जातीयवादी शक्तींनी अक्षयचा बळी घेतला
देशभरात या घटनेचा तीव्र निषेध बहुजन समाजातून व्यक्त होतोय

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या घटनेत सहभागी सात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं मात्र अद्यापही दोन आरोपी फरार आहेत
परिणामी सदर आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी यासह जलद गतीने निकाल मिळावा यासाठी खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय पँथर्स आघाडी कडून करण्यात आला आहे
निवेदनातून ही मागणी अविष राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे केली
कारवाई न झाल्यास आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलने छेडण्याचा इशारा देखील प्रशासनाला देण्यात आला
यावेळी त्यांच्या समवेत उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आघाडी वहिदा शेख, विनायक जाधव अर्शद खान, संतोष कांबळे ,लक्ष्मण रकमे, विद्या मोरे,किशोर राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..
ऋषिकेश जाधव ,पालघर प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज ,पालघर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here