तळोदा / नंदुरबार :2/6/23
जे विद्यार्थी नोकरी करतात व्यवसाय करतात त्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मुक्त विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जातात
जेणेकरून त्यांना आपल्या नोकरी आणि अर्थार्जनाबरोबर आपलं राहिलेले अर्धवट शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली
29 मे ते 15 जून पर्यंत बीए बीकॉम विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे
तळोदा वरिष्ठ महाविद्यालय हे केंद्र असून आसपासच्या विद्यार्थ्यांना या केंद्रातून परीक्षा देता येणार आहे
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तळोदा केंद्रात सुमारे एकूण 863 विद्यार्थी असून बीए अभ्यासक्रमाला 661 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत
बीकॉम या अभ्यासक्रमासाठी सुमारे 202 विद्यार्थी प्रविष्ट आहेत
केंद्रप्रमुख म्हणून प्राचार्य डॉक्टर एस एन शर्मा काम सांभाळत आहेत तर केंद्र संयोजक म्हणून डॉक्टर एस बी गरुड व केंद्र सहाय्यक म्हणून एस यु केदार काम पाहत आहे
विद्यापीठाकडून नियुक्त केलेले बहिस्थ केंद्रप्रमुख म्हणून डॉक्टर जितेंद्र बागुल काम पाहत आहे
विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.. त्यामुळे ज्ञानगंगा घरोघरी या मुक्त विद्यापीठाच्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने ते सार्थ ठरते.. त्यामुळे अशा व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांनी विविध अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा..
नितीन गरुड,तळोदा ग्रामीण प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज