Israel-Palestine War : युद्धाचा भडका; 5000 रॉकेट हल्ल्यात 100 हून अधिक जण ठार

0
1184
Israel-Palestine War

हमास आणि इस्रायल यांच्या पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. ( Israel-Palestine War )गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलवर डझनावर रॉकेट हल्ले केल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याला, इस्रायलच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी हमासने घेतली आहे. यानंतर, प्रत्युत्तरात इस्त्रायली लष्करानेही गाझा पट्टीत हवाई हल्ले केले.

हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर, इस्रायलमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच बरोबर, हमासच्या दहशतवादी संघटनेला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

आज पहाटे हमासने इस्रायलवर बॉम्बचा वर्षाव केला. तब्बल अर्धा तास हा बॉम्ब वर्षाव सुरू होता. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एका इमारतीवर रॉकेट पडल्याने एक 70 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच एक 20 वर्षीय व्यक्तीही जखमी झाला आहे. मात्र, त्याला किरकोळ मार लागला आहे.

ट्विट करत त्यांनी म्हटले आहे, तासाभरापूर्वी हमासच्या दहशतवादी संघटनेने हल्ला केला आहे. त्यांनी रॉकेट डागले असून इस्रायलच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. इस्रायली संरक्षण दल आपल्या नागरिकांचे संरक्षण करेल आणि हमासच्या दहशतवाद्यांना धडा शिकवेल.

इस्रायलवर हमासच्या ‘दहशतवादी हल्ल्यांचा’ नाटोने निषेध केला. – प्रवक्ता

दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हजारो रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये प्रचंड तणावाची परिस्‍थिती आहे. या हल्‍ल्‍यात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. केंद्र सरकारने इस्रायलमधील भारतीयाना सतर्क राहण्‍याचा सल्‍ला दिला आहे

तसेच त्यांचा हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. इस्रायलमध्ये हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सडेतोड प्रत्‍युत्तर देण्‍याचा निर्धार केला आहे

दहशतवादी संघटना हमासने केलेल्‍या हल्‍ल्‍यात इस्रायलमधील 22 नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे तर 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत

इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष पेटल्यानंतर आता, भारत सरकारने अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. भारताने इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सतर्क रहण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर, इस्रायलच्या स्थानिक अधिकऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने जारी केलेल्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्लाही भारत सरकारने दिला आहे.

महत्वाचे म्हणजे, अनावश्यक हलचाली टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा. असा सल्लाही भारत सरकारने आपल्या इस्रायलमधील नागरिकांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here