जळगाव:२४/२/२०२३
जामनेर तालुक्यातील एक तरुण आहे ज्याने स्वप्न उराशी बाळगलं होतं पोलीस भरती जाण्याचं..
ते स्वप्नाची दोर मधेच तुटली. आणि सारं काही होत्याचं नव्हतं झालं.. गेल्या दीड वर्षापासून पोलीस भरतीसाठी अभ्यास करत होता.. दिवस-रात्र मेहनत करत होता..
पण म्हणतात ना काळापुढे कुणाचा चाललंय.. असंच काही त्याच्या बाबतीत घडलं..
हा तरुण आहे जामनेर तालुक्यातील रोशन भैरू पवार..
वय वर्ष 22.. जामनेर तालुक्यातील पहुर पेठ अंतर्गत आंबेडकर नगरातील हा रहिवासी..
पोलीस भरतीत जायचं म्हणून गेले दीड वर्ष तो अहोरात्र मेहनत करत होता.. पुण्यातील पोलीस भरतीच्या जागांसाठी त्यानं अर्ज भरला.. सोमवारी पुण्यात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी पार पडल्या.
त्यावेळी त्या चाचणीसाठी रोशन रविवारी रात्री पुण्याकडे मार्गस्थ झाला..
सोमवारी त्याची भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. आनंदाची बाब म्हणजे पोलीस भरतीचे मैदान गाजवत त्याने तब्बल 90 मार्क्स मिळवले.
मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर रोशनला अचानक उलटीचा त्रास सुरू झाला.
पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला स्थानिक डॉक्टरांना दाखवून उपचार सुरू केले.
प्रकृती ठीक झाल्यानंतर पोलिसांनी रोशन यास पुण्यातून जळगावकडे येणाऱ्या रेल्वेत बसवून दिलं.
कुटुंबीयांना रोशन ने त्याच्या प्रकृती संदर्भात सावध केलं..
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रोशन भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरला..
आणि अचानक त्याचे प्रकृती खालवण्यास सुरुवात झाली.
त्यामुळे नातेवाईकांनी त्याला भुसावळातील रुग्णालयात दाखल केलं..
त्याचे कुटुंबीय देखील दवाखान्यात पोहोचले.
त्याला तात्काळ जामनेर येथील रुग्णालयात हलवलं.
मृत्यूची सुरू असलेली झुंज अखेर रोशनची अपयशी ठरली..
आणि त्याचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.. डाव रचला होता पोलीस भरती जाण्याचा, पण या गीतातील ओळी खऱ्या अर्थाने आठवतात रोशनच्या या प्रसंगात,
‘अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी,अर्ध्यावरती डाव मोडला,अधुरी एक कहाणी’.. पोलीस भरतीचं स्वप्न अखेर रोशनचं इथेच भंगलं.. रोशनच्या पश्चात आई-वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे..
या घटनेने पहूर गाव सुन्न झालं होतं..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो जळगाव