पोलीस प्रमुखांनी दिल सहकाऱ्यांना पदोन्नतीचं गिफ्ट..

0
181

नंदुरबार :११/३/२०२३

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमंलदारांच्या कल्याणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक व पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्याची संकल्पना मांडली

व तात्काळ मंत्रालयीन कर्मचारी यांचेकडून किती पोलीस अंमलदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक व पोलीस हवालदार पदावर पदोन्नती दिली जाईल ? याची माहिती घेतली.

तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांना तात्काळ पदोन्नतीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

मंत्रालयीन कर्मचारी यांचेकडून पदोन्नतीची कार्यवाही करुन पदोन्नतीस पात्र असणाऱ्या 06 अमंलदारांना दिनांक 09/03/2023 रोजी स्वत: पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात उपस्थित राहणेबाबत कळविले.

पदोन्नतीस पात्र असणाऱ्या पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात बोलविले. पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात का बोलाविले असेल ? असा प्रश्न त्या पोलीस अंमलदारांना पडला.

परंतु नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी त्या 03 पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उप निरीक्षक या पदावर व 03 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती झाल्याचे सांगताच त्या सर्व पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगूणीत होवून त्यांचे चेहऱ्यावर हसू फुलले.

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 03 पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उप निरीक्षक व 03 पोलीस नाईक पोलीस हवालदार या पदावर सेवा जेष्ठतेनूसार पदोन्नती दिलेली आहे.

पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील पोलीस अमंलदारांना पोलीस अधीक्षक यांचे दालनात एक छोटेखानी पण दिमाखदार कार्यक्रम आयोजित करुन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पोलीस अमंलदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक पदाचे स्टार व पोलीस हवालदार पदाचे फित लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले व पदोन्नती मिळालेले अंमलदार इत्यादी उपस्थित होते.
सहा. पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झालेले पोलीस अमंलदार: पुढीलप्रमाणे
1
पोह/560 सत्तार गणपत भिल, नेमणुक पोलीस मुख्यालय, नंदुरबार

2
पोह/533 गुलाब बिहारी जोहरी, नेमणुक अक्कलकुवा पोलीस ठाणे

3
पोह/37 अशोक प्रभुदास वळवी, नेमणुक धडगांव पोलीस ठाणे
पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झालेले पोलीस अमंलदार :
1
पोना/521 दिनेश कुसम्या गावीत, नेमणुक नंदुरबार शहर पोलीस ठाणे

2
पोना/1099 दिलवरसिंग पेचरा पाडवी, नेमणुक पोलीस मुख्यालय, नंदुरबार

3
पोना/07 गोपाल हिम्मतराव चौधरी नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार
प्रवीण चव्हाण,जिल्हा प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here