पोलिसांनी ३ तरुणांना ताब्यात घेतल अन् मोठं घबाडच हाती लागलं..

0
224

पालघर :२८/२/२०२३

पालघर जिल्ह्यात मोटारसायकली चोरण्याचा घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहावयास मिळालं .

त्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांनी दमदार कामगिरी बजावत या गुन्ह्यातील संशयितांना बेड्या ठोकल्या आणि ताब्यात घेतलं . तसंच लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय ..
पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील ,अपर पोलिस अधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांनी बोईसर एमआयडीसी परिसरात गुन्हे वॉच पेटो्लिंग करीत असताना रात्री ०१.२० वा चे सुमारास दि २० रोजी कॅमलिननाका ते नवमी हॉटेल जाणारे काही ईसम (1) राम सखाराम काकड वय १९ रा.मु. वांद्रे, पो.पिवली ता.शहापूर जि ठाणे (2)गुरुनाथ पांडूरंग झूगरे वाय २० रा .मु.बोटोशी बेलपाडा ता.मोखाडा जि.पालघर (3)नितेश संजय मोडक वय २२ रा.मु.वाघेची वाडी पो.झाप ता.जव्हार जि.पालघर या तीन ईसमांना ताब्यात घेतलं.

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे सत्र सुरु असून चोरट्यांनी धूमाकूल घातला आहे .

या पार्श्र्वभूमिवर बोईसर पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखाे रुपये किंमतीच्या मोटारसायकली चोरणार्या तीन संशायितांना बेड्या ठोकल्या आहेत .

पालघर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे .

paalghar news

संशयतांनी आजपर्यत चोरलेल्या तब्बल ३८ मोटारसायकल पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत संशायिस आरोपी १) राम सखाराम काकड वय १९ रा . मु. वाद्रे .पिवली ता.शहापूर जि.ठाणे (2) गुरुनाथ पांडुरंग झुगरे वय २० रा.मु.बोटीशी बेलपाडा ता.मोखाडा जि .पालघर (3)नितेश संजय मोकड वय २२ रा.मु. वाघेची वाडी पो.झाप ता. जव्हार जि . पालघर यांची कसून चौकशी केली असता त्याचेकडील बॅगमध्ये धारादार कोयता ,लोखंडी कटावणी ,मिरची पूड,दोरी ,कटर स्कू डायव्हर या सारखे हत्यार जवल बाळगताना पकडल्यानंतर मिळून आले .

त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता बोईसर एमआयडीसी मधील फास्ट टेकइंजिनिअर्स प्रा.लि.प्लॉट नं.ए-22 कंपनीचे मागील बाजूने कंपाउंड भितीवरुन आत प्रवेश करुन कंपनीतील सीसीटीव्ही वायर कट करुन वॉचमन यास दोरीने बांधून कंपनीतील तांब्याचे धातूचे साहित्य दरोडा टाकून चोरी करण्यासाठी आल्याचे सांगितले .

त्याच्याविरोधात बोईसर पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र ७१/२०२३ भादंविसक ३९९,४०२, सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी यांची पोलीस कोठडी रिमांड घेवून अधिक तपास केला असता त्यांनी त्याचे अन्य साथीदार आरोपीसह पालघर , ठाणे , ग्रामीण ,नाशिक ग्रामीण , मिरा भाईदर ,वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरातून अनेक मोटार सायकली चोरी करुन त्या जव्हार , शहापूर परिसरात विक्री केल्याचे निष्पत्र झाल्याने अटक आरोपींकडून चोरी केलेल्या एकून १९,६०,०००/-रुपये किंमतीच्या ३८ मोटारसायकली असा एकूण किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

दरम्यान पोलिसांनी तीन मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेतलं .

संशायितांकडून हस्तगत केलेल्या मोटारसायकली या एखाद वाहन बाजार भरवता येईल एवढ्या आहेत.

पोलिसांनी जप्त केलेल्या मोटारसायकली पोलीस ठाण्यात आणून ठेवल्यानंतर पोलीस ठाण्याला जणू वाहन बाजाराचे स्वरुपच प्राप्त झाले होते .

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील ,अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट,पोलीस उप अधीक्षक (गुह)अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर , स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पो. उप. नि / सागर पाटील ,पो. उ. नि भरतेश हारुगिरे,दिपक राऊत , कैलास पाटील, रणजीत पाटील ,असिफ कलायगार, सुरेश पाटील , दिनेश गायकवाड, कपिल नेमाडे , नरेंद्र पाटील , हिरामण खोटरे , संद्प सरदार , नरेश घाटाळ यांच्यासह सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी केलेली आहे .

ऋषीकेश जाधव,पालघर प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here