भारतीय नागरिकांसाठी आरबीआयकडून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बँकेतून पैसे काढताना ग्राहकांना रागेंचा आणि गैरसोयीचा त्रास होऊ नये यासाठी एटीएम मशीन वापरात आणण्यात आल्या.
या एटीएम मशीनच्या माध्यमातून ग्राहकांना कोणत्याही ठिकाणी पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. संबंधीत बँकेच्या डेबिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना पैसे काढता येतात.
सद्यस्थितीत एटीएममधून केवळ नोटा काढता येत होत्या. मात्र आता ग्राहकांना चिल्लरही या एटीएममधून मिळणार आहेत.
या कॉईन व्हेंडिंग मशिन्समधील कोणताही ग्राहक त्याच्या UPI ॲपद्वारे मशीनच्या वरचा QR कोड स्कॅन करून नाणी काढू शकेल. ग्राहक जितकी नाणी काढेल, ती रक्कम त्याच्या नोंदणीकृत बँक खात्यातून डेबिट केली जाईल.
ज्याप्रकारे एटीएममधून डेबिट कार्डद्वारे नोटा काढल्या जातात. त्याचप्रमाणे या मशीनमधून QR कोड स्कॅन करून नाणी काढता येणार आहे. 12 शहरांमध्ये सुरू होणाऱ्या या पथदर्शी प्रकल्पाच्या यशाच्या आधारे त्याचा विस्तार करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने रेपो दरवाढीच्या निर्णयाने देशातील सर्वसामान्य जनतेला धक्का दिला असतानाच त्यांनी अशा नव्या घोषणांमधून दिलासा देण्याचे काम केले आहे.