शिरपूर : २३/२/२०२३
गेल्या काही दिवसांपासून हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागला आहे.
यामुळे काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होत असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
शिरपूर तालुक्यातील आरोग्यकेंद्रे तसेच खासगी दवाखान्यांत मागील काही दिवसांपासून या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
फेब्रुवारी महिन्यातच ऑक्टोबर महिन्यासारखा हिटचा तडाखा जाणवत असून दुपारी कडक ऊन व सकाळी आणि रात्री थंडीचे वातावरण सध्या तालुक्यात जाणवत आहे.
या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागल्यामुळे साथीचे आजार पसरण्यात वाढ होऊ लागली आहे.
ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, थंडी, अशी विविध कारणे घेऊन रुग्ण तालुक्यातील आरोग्यकेंद्रे तसेच खासगी दवाखान्यांत गर्दी करू लागले आहेत.
बदलत्या हवामानाची झळ अबालवृद्धांना बसली असून जेष्ठ नागरिकांसह विशेषतः बालकांची गर्दी रुग्णालयात वाढली आहे. दरम्यान वातावरणात होणाऱ्या या बदलामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला तालुक्यातील बभळाज येथील खाजगी डॉक्टर लखन महाजन, डॉक्टर अशोक चौधरी, व डॉक्टर देवेंद्र पाटील यांनी आमच्या MDTV NEWS चे प्रतिनिधी राज जाधव यांच्याशी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय.
राज जाधव,शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज