बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बसणार फटका : राजकीय चर्चांना उधाण
बुलढाण्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक मोठे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादीशी घरोबा करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसे झाल्यास बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर बुलढाण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास मदत होईल, अशा चर्चांना उधाण आले आहे.
विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार दोन दिवस नॉट रिचेबल झाल्याने महाविकास आघाडीसह साताधारी पक्षात एकच खलबते सुरु झाली होती. मात्र, दुसऱ्यादिवशी अजित पवार यांनी माध्यमासमोर येत प्रतिक्रिया दिल्यावर राष्ट्रवादीने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, आगामी राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर खलबते सुरु असताना राष्ट्रवादीने मोठी खेळी करीत एक मोठा नेत्याचा पक्षप्रवेश करण्याची रणनीती आखली आहे. यात राष्ट्रवादीला यश आल्याचे देखील बोलले जात आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
बुलढाण्यातील स्वाभिमानीचे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादीशी घरोबा करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खान्देशातील राष्ट्रवादीचे एक नेते यांनी बुलढाण्यात जाऊन या स्वाभिमानी नेत्याची भेट घेतली असून दोघामधे एक तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, त्यामुळे बुलढाण्यात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते हे आज बुलढाणा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आले होते. या दरम्यान त्यांनी या स्वाभिमानी नेत्याची भेट दिली व त्यांच्यात आगामी राजकीय घडामोडीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी दोघा नेत्यांमध्ये जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा बुलढाण्यात रंगू लागली आहे. यावर स्वाभिमानी नेत्याने सध्या तरी चुप्पी साधली आहे. राष्ट्रवादी व स्वाभिमानी नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, स्वाभिमानीचे नेते यांचे पक्ष प्रमुख यांच्यात गेल्या वर्षभरापासून मतभेद असल्याच्या रंगल्या होत्या. त्यामुळे हे नेते नाराज असल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे. या कारणामुळे बुलढाण्यातील हे स्वाभिमानी नेते राष्ट्रवादीसोबत घरोबा करून मनगटावर घड्याळ बांधणार काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार, मुंबई