बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण

0
325

तळोदे तालुक्यातील नयामाळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तळोदा तालुक्यातील शीर्वे परिसरातील नयामाळ या गावात सरिता वन्या वसावे या (वय ३३ ) रात्री घरात झोपलेल्या असताना पहाटेच्या सुमारास कुडाचा दरवाजा तोडून बिबट्याने महिलेला ५० ते ६० मीटर बाहेर ओढून नेत त्यांच्या शरीराचे लचके तोडल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या. यामुळे परिसरात भीती निर्माण झाली असून वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV

तळोदा तालुक्यातील नयामाळ येथील नरशा वन्या वसावे, खाल्या वसावे, पोचल्या वण्या वसावे यांच्या शेताच्या परिसरामध्ये सदर महिलेचे मृत शरीर आढळून आले. याबाबत सकाळी माहिती मिळतात तळोदा म्हणून विभागाचे कर्मचारी तळोदा येथील सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV

अक्कलकुवा वनक्षेत्रपाल ललित गवळी व त्यांचे वन कर्मचारी घटनास्थळापासून ते इतरत्र अधिक माहिती गोळा करीत आहेत. घरापासून महिलेचा मृतदेह पन्नास ते साठ मीटर अंतरावर आढळून आला. तर धडापासून शिरदेखील ३० मीटर अंतरावर आढळून आले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दरम्यान, तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात सदर मृत महिलेचे विच्छेदन करण्यात आले असून बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या मानवी संख्येत आणखीन एक वाढ झाली याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV

याबाबत नरशा वसावे यांनी तळोदा पोलीस स्टेशनला खबर दिली असून याबाबत नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार करीत आहेत. दरम्यान, सदर घटनेमुळे परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली असून याबाबत वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

एमडी.टीव्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here