संपर्क प्रमुख प्रा.शरद पाटील यांनी व्यक्त केला विश्वास ; नंदुरबारात प्रसार माध्यमांना दिली माहिती
नंदुरबार :- पक्षाला संकटे झेलण्याची ताकद आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना कठीण संकटाचा सामना करत आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसतांनाही नव्या जोमाने पक्ष संघटनासाठी ते पुढे आले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे चेहरा असणाऱ्या प्रमुख नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता पुन्हा नव्याने पक्ष संघटनासाठी प्रयत्न सुरु आहेत. जुन्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पुन्हा एकदा पक्ष भक्कम स्थितीत येणार असून सध्याचा कालावधीत पक्षाचा विस्तार वाढला आहे. यामुळे येत्या कालावधीत पुन्हा एकदा पक्षाची ताकद राज्यात दिसणार आहे असा विश्वास शिवसेना (ठाकरे गट) संपर्क प्रमुख तथा माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी नंदुरबार येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अक्कलकुवा येथे आयोजित आढावा बैठकीनंतर प्रा.पाटील यांनी नंदुरबार येथे शासकीय विश्राम गृहात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख चेहरे असलेले नेते पक्षाला सोडून गेल्याने आता शून्यापासून पुन्हा सुरुवात करणार आहोत. जुन्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पक्ष संघटन मजबूत करणार असून पुन्हा एकदा पक्षाची ताकद जिल्ह्यात वाढणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे चेहरा असणाऱ्या प्रमुख नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता पुन्हा नव्याने पक्ष संघटनासाठी प्रयत्न सुरु आहेत. जुन्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पुन्हा एकदा पक्ष भक्कम स्थितीत येणार असल्याचा विश्वास आहे. भाजपाने केलेल्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहानुभूतीची प्रचंड लाट आहे. यामुळे येत्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार असल्याचे प्रा.पाटील यांनी यावेळी सांगितले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्ष हिंदूत्व घेऊनच आजही वाटचाल करीत असून सध्याचा कालावधीत पक्षाचा विस्तार वाढला आहे. यामुळे येत्या कालावधीत पुन्हा एकदा पक्षाची ताकद राज्यात दिसणार आहे. आगामी निवडणूकांमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढविणार आहोत. स्थानिक पातळीवर पक्षाचे संघटन मजबूत झाल्यास स्वबळावर अथवा भाजप विरोधात लढणाऱ्या मित्र पक्षांसोबत जाऊन निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव आल्यास तसाही विचार पक्ष नेतृत्वाकडून केला जाण्याची शक्यता असल्याचे प्रा.पाटील यांनी यावेळी सांगितले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबारला नैसर्गिक साधन संपत्तीचा ठेवा आजही संवर्धन केलेला दिसून येतो. विविध प्रकारच्या औषधी, वनस्पती या परिसरात आढळून येतात. तसेच महू फुलांवर आणखी संशोधन झाल्यास फायदेशीर ठरणार आहे. यामुळे नंदुरबारला कृषी विद्यापीठ झाल्यास ते सोयीचे होणार असून यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. येत्या कालावधीमध्ये नंदुरबारला कृषी विद्यापीठ यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे माजी आ.प्रा.शरद पाटील म्हणाले. याप्रसंगी अतुल सोनवणे, दीपक गवते, कैलास पाटील, पंडीत माळी आदी उपस्थित होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.