नंदुरबारचे तापमान घटले … ०.५ मिमी बेमोसमी पाऊस !… कधी सक्रिय होईल मान्सून ?

0
210

Nandurbar Rain news : केरळपाठोपाठ मान्सून (Monsoon २०२३) महाराष्ट्रातही दाखल झाला. पण अद्याप काही सक्रीय झाला नाही. २१ जून पर्यंत मान्सूनचा पाऊस सुरु न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून आता गावागावात ‘मेघराया’ बरसण्यासाठी विविध उपक्रम सुरु झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात तापमानात मोठी घट निर्माण झाली असून गेल्या काही दिवसापासून ऊन- सावल्यांचा खेळ सुरु आहे. जिल्ह्यात मे एंडिंग ते जूनच्या सुरुवातीला ४४ अंश असणारे तापमान ३६ अंशावर आले आहे. ढगाळ वातावरणात ०.५ मिमी पाऊस झाला असला तरी तो सक्रिय मान्सूनचा नाही. त्यामुळे मात्र, वरुणराजा अजूनही बरसत नसल्याने शेतकऱ्यांपासून ते सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जिल्ह्यात खरिपाची पेरणीपूर्व तयारी पूर्ण झाली असून आता मात्र मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

हे सुध्दा वाचा

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biparjoy Cyclone) मान्सूनवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रवास लांबला असून राज्यात मान्सून २६ जूननंतर सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्याने (Weather Department) वर्तवला आहे. त्यामुळे पावसासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

जूनचा तिसरा आठवडा संपला तरी देखील मान्सूनने जोर पकडला नाही. राज्यात काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पाऊस जोर कधी पकडणार याची सर्वजण वाट पाहत आहे. त्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु असल्यामुळे उकाड्यामुळे जनता हैराण झाला आहे. अशामध्ये हवामान खात्याने महत्वाची माहिती दिली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सून २६ जूननंतर सक्रीय होईल. तर या आठवड्याच्या शेवटी मुंबईत मान्सून जोर धरेल आणि मुंबईकरांची उकाड्यातून सुटका होण्याची शक्यता आहे. २३ आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हे सुध्दा वाचा

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

फक्त महाराष्ट्रात नाही तर देशातील इतर जिल्ह्यातही तिच परिस्थिती आहे. पाऊस नसल्यामुळे उष्णता प्रचंड वाढली आहे. अशामध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम आहे. अशामध्ये देशाची राजधानी दिल्लीसह काही राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे दिल्लीकरांची उकाड्यातून सुटका झाली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाम, पश्चिम बंगाल, सिक्कीम तसेच मध्य प्रदेशात आज पावसाची शक्यता आहे. यासोबतच तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेट, केरळ आणि पश्चिम हिमालयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचसोबत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. सध्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठी घट निर्माण झाली असून गेल्या काही दिवसापासून ऊन- सावल्यांचा खेळ सुरु आहे. मे एंडिंग ते जूनच्या सुरुवातीला जळगाव ४६ अंश, धुळे- नंदुरबार ४४ अंश असणारे तापमान ३६ अंशावर आले आहे. ढगाळ वातावरणात नंदुरबारात आज ०.५ मिमी पाऊस झाला असला तरी तो सक्रिय मान्सूनचा नाही. त्यामुळे मात्र, वरुणराजा अजूनही बरसत नसल्याने शेतकऱ्यांपासून ते सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जिल्ह्यात खरिपाची पेरणीपूर्व तयारी पूर्ण झाली असून आता मात्र मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

एमडी.टीव्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here