ठाकरे गटाने केलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन …

0
148

पाचोरा,जळगाव : दि.१२/०२/२०२३

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या पाचोरा येथील वैशाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या कठोर निर्णयाविरुद्ध एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं .

महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा निषेधार्थ अणि त्यांच्याकडून शेतकरी बांधवाविषयी चुकीचे धोरण अंमलबजावणी केल्यामुळे पाचोरा तहसील कार्यालयसमोर आंदोलन केलं.

या आंदोलनात या पुढील मागण्यांचा समावेश प्रामुख्याने होता-

  • शेतीमाल आयात बंदी झाली पाहिजे.
  • शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला पाहिजे.
  • वीजबिल थकबाकी माफ झाली पाहिजे.

यासह विविध मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला होता.पाचोऱ्याच्या तहसीलदारांना यावेळी निवेदन देण्यात आलं.

या आंदोलनात दिपकसिंग राजपूत(शिवसेनाजिल्हाप्रमुख),अरुणभाऊ पाटील(जि.प्र.शेतकरीसेना), शरद पाटील (तालुकाप्रमुख),विनोद बाविस्कर(उपजिल्हा संघटक),अभय पाटील(.उपजिल्हाप्रमुख),धर्मराज पाटील(उप.जि.समन्वयक),देवीदास पाटील(तालुका संघटक),ज्ञानेश्वर पाटील(ता.समन्वयक),अनिल सावंत व दिपक पाटील(शहर प्रमुख,पाचोरा),दत्ता जडे व राजेंद्र राणा(शहर संघटक,पाचोरा),गोरख पाटील(उप.जि.समन्वयक,भडगाव),फ़किरा पाटील(तालुका संघटक,भडगाव),जीभाऊ पाटील(ता.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पाचोरा),तिलोतमा मौर्य(उप.जि.संघटिका महिला आघाडी,पाचोरा)आदि सर्व शिवसेना,युवासेना,महिला आघाडी,अल्पसंख्याक आघाडी,संभाजी ब्रिगेड व अंगीकृत संघटनाचे मान्यवर उपस्थित होते.

सतीश पाटील,तालुका प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज,भडगाव ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here