शरद पवारांवरील धोका टळला .. अखेर अटक

0
346

पुणे -१२/६/२३

Mumbai Police: मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने (Mumbai Crime Branch) आरोपीला पुण्यातून अटक केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar Threat) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने (Mumbai Crime Branch) आरोपीला पुण्यातून अटक केली.सागर बर्वे (34 वर्षे) असं या आरोपीचे नाव आहे.
सागरने एका ट्विटर हँडलवरुन आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांना धमकी दिली होती.

हे सुद्धा वाचा ..

नाशिकमध्ये आणखी मोठा मासा ‘एसीबी’च्या गळाला; मनपा शिक्षणाधिकारी धनगर लाच घेताना जाळ्यात.. – MDTV NEWS

बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS


या धमकी प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांना धमकी देणारा आरोपी सागर बर्वेला रविवारी पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा ..

नाशिकमध्ये आणखी मोठा मासा ‘एसीबी’च्या गळाला; मनपा शिक्षणाधिकारी धनगर लाच घेताना जाळ्यात.. – MDTV NEWS

बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS
अटक केल्यानंतर आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी सागर बर्वेने फेसबुकवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ नावाने पेज तयार केले होते.
त्याने या फेसबुक पेजवरुन शरद पवार यांना उद्देशून ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…’, अशी धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
यासोबतच सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुनही आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये शरद पवार यांची तुलना औरंगजेबाशी करणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता.
अखेर पोलिसांनी त्याला अटक केलीय ..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,पुणे ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here