‘या’ जिल्ह्यातील आहे वाट खडतर…

0
108

नंदुरबार -२/४/२०२३

एकीकडे महाराष्ट्र शासनाने समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून रस्ते आणि त्याचं चौपदरीकरण केलं मात्र अजूनही नंदुरबार जिल्हा आणि आदिवासी जिल्ह्यातले रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत..

प्रशासन पूजलंय पाचवीला याचा प्रत्यय येतो आदिवासी नंदुरबार जिल्ह्यातल्या या रस्त्यांची ही दुर्दशा पाहून..

हजारो वर्षांपासून नंदुरबारचा आदिवासी डोंगरदर्‍यांच्या कुशीत राहणारा…

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

खरोखर तेथील रस्ते आणि रस्त्यांची दुर्दशा पाहून कोणालाही प्रश्न पडेल ही वाट दूर जाते…

ही खडतर वाटेतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या आदिवासींना..

अक्कलकुवा धडगाव तालुका अतिदुर्गम भाग… नंदुरबार स्मार्ट शहर स्मार्ट कधी होणार? कागदावर स्मार्ट प्रत्यक्षात मात्र काय?

जेव्हा पाडा गावला आणि गाव तालुक्याला आणि तालुका जिल्ह्याला जोडले जाणार दळणवळणाची साधनं या रस्त्यावरून होतात

तेच रस्ते प्रशासनाच्या खाबुगिरीमुळे अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत…

नंदुरबार जिल्ह्याच्या रस्त्यांच्या दुर्दशेचा प्रश्न खंबीरपणे लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार आमशा पाडवी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला.. ऐकूया पाडवी यांनी नेमकं काय दुःख नंदुरबार जिल्ह्यातल्या रस्त्यांबद्दल व्यक्त केलं..

तर नंदुरबार विर एकलव्य आदिवासी महिला सेना जिल्हाध्यक्ष एडवोकेट शितल गायकवाड बागुल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या रस्त्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या एका वाटसरू चा हा व्हिडिओ व्हायरल केला…

त्यात त्याने सरकारवर ताशेरे तर ओढलेच पण अधिकारी आणि प्रशासन पाचवीला पुजलेले आहेत याचा प्रत्यय येतो ..

विकासापासून कोसो दूर असणाऱ्या आदिवासींना आता प्रतीक्षा आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती संदर्भातल्या निर्णयाची..

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्य सरकारने एका विशिष्ट भागाची समृद्धी केली..

पण हाच असाच समृद्धी महामार्ग नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी जनतेच्या विकासाचा रस्त्यांच्या रूपातून कधी विकसित होईल

आणि हक्काचे डांबरी रस्ते मिळतील ही आस लावून बसलाय.. ऐकूया या छोट्याशा क्लिप मधला हा व्यक्ती नेमकं काय व्यथा मांडतोय..
नारायण ढोडरे, नंदुरबार तालुका प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here