मराठी चित्रपट न दाखवल्यास चित्रपटगृहांना १० लाख रुपये होणार दंड

0
224

मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. मात्र राज्य सरकारने मराठी चित्रपट व्यवसायाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपटाच्या हिताने एक मोठी घोषणा केली आहे. मराठी सिनेमांना सिनेमागृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करून देण्याबाबतची बैठक मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने मराठी चित्रपटांसाठी सिनेमागृह उपलध्द होण्यासाठी महत्पूर्ण निर्णय घेण्यात आला. वर्षातून किमान चार आठवडे मराठी चित्रपट न दाखवल्यास चित्रपटगृहांना १० लाख रुपये दंड ठोठावण्याची शिक्षा करण्याचा निर्णय या बैठीकत घेण्यात आला आहे. मुख्यत: या अटीचे पालन केले नाही, तर परवाना नूतनीकरणाच्या वेळी या चित्रपटगृहांकडून हा दंड वसूल केला जाणार आहे. त्यासंदर्भात गृह विभागाला अधिसूचना देण्याचा निर्णय करण्यात आला. तसेच सिंगल स्क्रीन चित्रपटगृहामध्ये भाडे वाढवू नये, असाही निर्णय घेण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही सिनेमांना थिएटर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये थिएटरमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या १५ दिवसांमध्ये मराठी सिनेमा निर्मात्यांनी आपली निवेदने द्यावीत, जेणेकरून या विषयाबाबत विस्तृत बैठक १५ जूननंतर घेण्यात येईल, असे यावेळी सांगितले. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे आदी उपस्थित होते.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here