नंदुरबार:२४/२/२०२३
विवाह समारंभातील जुन्या चालेरीतींना फाटा देण्यासाठी आणि नवीन नियम रुजू करून विवाह कमीत कमी खर्चात पार पडावेत म्हणून पाडळदावासी यांनी बैठक घेतली..
याला गावातून बंधू-भगिनी अविवाहित तरुण-तरुणींनी साथ दिली..
समाजात विवाह समारंभा संदर्भात असलेल्या जुन्या चालीरीती बदलून नवीन परंपरांना साथ द्यायची लग्नावरील अवाजवी खर्च कसा टाळता येईल यासाठी नवीन नियम घालून दिलेत..
- ते नियम असे..
रिंग सेरेमनी बंद, प्री-वेडिंग शूटिंग बंद, मेहंदी सेरेमनी बंद, रथ आणि बग्गीबंद तर नवरदेव आणण्यासाठी फक्त घोड्या आणणे, फोटोग्राफी मर्यादित करणे,
गांधी टोपी परिधान करण्यावर भर देणे, ब्युटी पार्लर फक्त नवरी पुरतेच मर्यादित ठेवणे,
सगाई नंतर संक्रांत भेट बंद करणे, रसपुरी जेवणाची पद्धत बंद ठेवणे,
फ्री बर्थ फोटोशूटचे फोटो सोशल करणे बंद करणे आदी नवीन नियम घालून दिले..
हे सर्व नियम जे कुटुंब पाहणार नाहीत त्यांच्याशी गावकरी कुठल्याही प्रकारचे हितसंबंध ठेवणार नाहीत..
कुठलेही सहकार्य गावांकडून मिळणार नाही असं जाहीर करण्यात आलं.
या धाडसी निर्णयाचं तरुण-तरुणींच गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात आलं..
स्त्री वर्गाचं मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन करण्यात आलं..
एम.डी.टी.व्ही न्यूज कडूनदेखील या सामाजिक आणि धाडसी निर्णयाचं मनःपूर्वक स्वागत आणि निर्णय घेणाऱ्यांच अभिनंदन..
या बातमीसाठी राकेश पटेल सह एम.डी. टी.व्ही .न्यूज ब्युरो नंदुरबार