“हा ” दिवस भारतीय पाळतात शहिदांना श्रद्धांजली वाहून काळा दिवस !

0
251

.. ” जरा याद करो कुर्बानी ” पुलवामा हल्ल्याला झाले चार वर्षे पूर्ण….

शिरपूर,धुळे : १५/२/२३

  • शॉर्ट हेडलाईन
  • 1 14 फेब्रुवारी 2019 ला झाला होता भ्याड हल्ला
  • 2 तरुणाई करते एकीकडे प्रेम दिवस साजरा तर भारतीय पाळतात काळा दिवस
  • 3 शिरपुरातील कुवे येथे शहिदांना वाहिली श्रद्धांजली

जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातोय तर चार वर्षांपासून हाच दिवस देशासाठी काळा दिवस ठरला..

एकीकडे तरुणाई करते व्हॅलेन्टाईन डे साजरा,तेव्हा एक सैनिक या प्रेमीयुगुलाला करून देतोय आठवण या काळा दिवसाची आणि पुलवामा हल्ल्याची पहा जरूर हा व्हिडिओ …

जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जात असताना भारताच्या इतिहासात या दिवसाची नोंद काळा दिवस म्हणून आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्याला चार वर्ष पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता… पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्या घटनेला चार वर्षे पूर्ण झाली असून देशभरात शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

एकीकडे तरुणाई व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य सणाला साजरा करण्यात मग्न होती तर दुसरीकडे भारतीयांसाठी हा दिवस काळा होता.. कारण आपल्या भारतीय भूमिपुत्रांनी वीरमरण पत्करलं होतं..

नेमका काय होता हा हल्ला..?
पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ च्या बस वर हल्ला केलेला.. त्यावेळी बस मधून प्रवास करत असलेले भारतीय 40 जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यामागे जैश -ऐ मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केलेला.. भारताने आपले 40 जवान गमावले.. तर दुसरीकडे याच दिवशी भारतात ठिकठिकाणी तरुण व्हॅलेंटाईन डे चा उत्सव साजरा करतात..

मात्र भारतीयांच्या मनात आजही या शहिदां प्रति उत्कट भाव असून त्याचा प्रत्यय आला शिरपूर तालुक्यातील कुवे या गावात.. या गावातील ग्रामस्थांनी आणि माजी सैनिकांनी, तरुणांनी हातात कॅण्डल घेऊन गावातून नगरप्रदर्शना केली. 14 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7:00 वाजता ‘भारत माता की जय’, ‘भारतीय शहीद जवान अमर रहे’ असा जयघोष करण्यात आला.. आणि या जवानांच्या आठवणींना उजाळा दिला. पाहूया हा कॅन्डल मार्च..

01
02

यावेळी माजी सैनिक दिवाण पवार वसंत पवार महेंद्र पवार भाजपा सरचिटणीस रणजीत राजपूत यांनी मनोगते व्यक्त केलीत. शब्दसुमनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विदेशी संस्कृतीचा व्हॅलेंटाईन दिवस साजरा करण्यापेक्षा या भारतीय जवानांच्या बलिदानाला विसरता कामा नये.. त्यांचं बलिदान हा काळा दिवस म्हणून साजरा केला जावा, ” जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी, “ आजच्या तरुण पिढी समोर या गावकऱ्यांनी नवा आदर्श उभा केला आहे.

एम डी टी व्ही न्यूजचा या शहीद जवानांना सलाम..

नवल कढरे,शिरपूर तालुका प्रतिनिधी एम डी टीव्ही न्यूज…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here