धुळे:१४/२/२०२३
धुळे कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या एका खावटी प्रकरणात आईच्या ताब्यात असलेल्या मुलाचा वाढदिवस मुलाच्या वडिलांनी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश न्या.देवेंद्र उपाध्ये यांच्या परवानगीने समुपदेशक अनुराधा खरात मॅडम यांच्या सहकार्याने केक कापून साजरा केला.
दिवसेंदिवस पती पत्नीचे वाढत चाललेले भांडणे कौटुंबिक व सामाजिक पातळीवर न मिटला किंवा न मिटवता पक्षकार थेट न्यायालयाची घाव घेतात.यात जर दोघांना मुलं असतील तर यात सर्वात जास्त पक्षकारांच्या मुलांचे भवितव्य धोक्यात असते.मुलं हे आई कडे असतील तर वडिलांच्या छत्रछायेपासून वंचीत असतात,तेच आईच्या बाबतीत पण आहे.मूल जर बापाच्या ताब्यात असतील तर ते आईच्या मातृत्वापासून वंचीत राहतात.
धुळे कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या अश्याच एका खावटी प्रकरणात जाब देणार असलेल्या व्यक्तीने मुलाचा वाढदिवस मला साजरा करावयाचा आहे यासाठी खावटी प्रकरणात मागील तारखेला जाब देणार याने कोर्टाला विनंती केली होती.सदरची विनंती कोर्टाने मान्य करून मुलाचा वाढदिवस असलेल्या दिवशी सदर खावटी प्रकरण कोर्टात ठेवण्यात आले होते.
खावटी प्रकरणातील पक्षकार यांना दोन मुलं वय वर्ष ४ व ६ अशी आहेत.दोन्हीही मुलं अर्जदार आई कडे आहेत.मुलाचा वाढदिवस केक कापून साजरा व्हावा अशी इच्छा मुलाच्या वडिलांची होती.त्यानुसार दि.१३/२/२०२३ रोजी दुपारी २:००वाजता फॅमिली कोर्टाच्या हॉल मध्ये न्या.देवेंद्र उपाध्ये यांच्या परवानगीने समुपदेशक अनुराधा खरात मॅडम यांच्या सहकार्याने आई,वडील,आजी, आजोबा तसेच वकील वर्ग,पक्षकार,न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.
एका खावटी प्रकरणातील पक्षकाराला आपल्या मुलाचा वाढदिवस आपल्या उपस्थितीत साजरा करण्यात आल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. यासाठी सदर पक्षकाराने कौटुंबिक न्यायालयाचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
ऍडव्होकेट दीपक जोशी यांच्यासह न्यायालयातील कर्मचारी आणि त्या मुलाचे पालक,कुटुंबीय उपस्थित होते.
धुळेहून एम डी टी व्ही न्यूज ब्युरो