…हि वाट झालीय जीवघेणी …

0
132

Nandurbar:१०/०२/२०२३

पर्यटकांचे वर्षा पर्यटनाचे आवडते ठिकाण असलेल्या तोरणमाळ घाटात रस्ता खचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ऐन महाशिवरात्रीच्या काळात या भागात आदिवासी बांधव आणि भाविक हजारोंच्या संख्येने येतात ..मात्र रस्ताच खचल्याने वाहनधारकांसह नागरिकांना ,आदिवासींना हा प्रवास खडतर ठरू लागलाय..

हि पहा खडतर वाट …

..तोरणमाळ येथील सात पायरी घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे.वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तसेच गुजरात आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचे वर्षा पर्यटनाचे आवडते ठिकाण असलेल्या तोरणमाळ घाटात रस्ता खचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली .

वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रस्ता खचल्याने मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी एकाच वेळी दोन वाहने पास होऊ शकत नाही.

दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचा जनसंपर्काचा हा रस्ता असून तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्याही मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गाड्या ये-जा करत असतात. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अपघात होऊ शकतो.

सार्वजनिक बांधकाम विभागाने राणीपूरपासून तोरणमाळपर्यंत असलेल्या 22 किलोमीटर घाट मार्गाची ज्या ठिकाणी रस्ते खचले आहेत त्या ठिकाणची दुरुस्ती करावी मागणी परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे.

शहादाहुन शाम पवार एम डी टी व्ही न्यूज प्रतिनिधी ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here