नंदुरबारात राष्ट्रवादीचा मेळावा ; कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागण्याचा पवारांनी दिला कानमंत्र !
नंदुरबार :१५/६/२३
देशात राष्ट्रीय नेत्यांना धमकी दिली जाते आहे तर सर्वसामान्यांचे काय?… देशात व राज्यात नेमके काय सुरु आहे? … असा सवाल उपस्थित करीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाली असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नंदुरबार येथे केली. येत्या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीत एकी ठेवावी लागणार आहे. यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारपणे वागावे, असा कानमंत्र अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
फोटो सेशन करुन जनतेचा पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नाही. आघाडीचे सरकार असतांना उपसा सिंचन योजनांना गती देण्यात आली. मात्र त्यानंतरच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. तुम्ही जास्तीत जास्त आमदार निवडून दिले तर मुख्यमंत्री होता येईल व त्यानंतर तापी-बुराई सिंचन योजना मार्गी लावता येईल, असे आवाहन देखील अजितदादा पवार यांनी केले.
नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे देखील ओढले. ते म्हणाले की, सन १९९८ मध्ये सत्ता असतांना जिल्हा निर्मिती केली. वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करुन दिले. जिल्ह्यात विकासाच्या योजना याव्यात यासाठी आदिवासी विकास खात्याची जबाबदारी दिली. यातून केवळ जिल्ह्याची आर्थिक उन्नती व्हावी ही प्रामाणिक भावना होती.
हे सुध्दा वाचा
नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS
फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS
मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी –
नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतर, बेरोजगारी, कुपोषण अशा अनेक समस्या आहेत. यामुळे लगतच्या स्थानिक नर्मदा व तापी नदीच्या पाण्याचे योग्य उपयोग केल्यास शेती बागायती होवून रोजगार उपलब्ध होणार आहे. आघाडीचे सरकार असतांना उपसा सिंचन योजनांना गती देण्यात आली. मात्र त्यानंतरच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तुम्ही जास्तीत जास्त आमदार निवडून दिले तर मुख्यमंत्री होता येईल व त्यानंतर तापी-बुराई सिंचन योजना मार्गी लावता येईल, असे आवाहन त्यांनी केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
राज्यसरकाच्या कामांवर त्यांनी यावेळी टीका केली. जलजीवन मिशन ठेकेदारांच्या सोयीसाठी चालविलेली योजना असून मोठ्या प्रमाणावर यात भ्रष्टाचार असल्याचा आरोपही पवार यांनी केला. प्रशासनाच्या दुर्लक्षाने घरकुलचे लाभार्थी वंचित राहत असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात दोन वर्षात सुमारे दीड हजारांहून बालमृत्यू व मातामृत्यू झाले आहेत. देश अमृत महोत्सवी वर्ष तर नंदुरबार जिल्हा निर्मितीची रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असतांना येथील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मेळाव्यात केले.
या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी जिल्ह्यात रस्ते कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून त्याबाबत लक्षवेधी उपस्थित करुन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत नंदुरबार, शहादा, तळोदा या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास दाखवत राष्ट्रवादीसाठी या जागा देण्यात याव्यात, अशी मागणी अजित पवार यांच्यासमोर केली.
मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी केले. प्रतिकूल परिस्थितीत पक्ष संघटन मजबूत केले असून कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचा प्रयत्न केला आहे. कमी दिवसात राष्ट्रवादीची पुन्हा भक्कम स्थिती जिल्ह्यात निर्माण झाल्याने येत्या विधानसभा निवडणूकीत दोन जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जि.प.सदस्य मोहन शेवाळे ,पालिकेचे माजी प्रतोद मोहन माळी, सिताराम पावरा, दानिश पठाण, डॉ.जितेंद्र भंडारी, सीमा सोनगीरे, तुषार सनंसे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा निरीक्षक नाना महाले, मधुकर पाटील, हितेंद्र क्षत्रिय, डॉ.नितीन पवार, ॲड.अश्विनी जोशी, संदिप परदेशी, सुरेंद्र कुवर, अल्का जोंधळे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.
एम डी टी व्ही न्युज ब्युरो, नंदुरबार