BIG BREAKING: मुंबईत रेल्वे अपघात वाहतूक बंद..

0
374
Three coaches of a local train derail near Kharkopar railway station in Navi Mumbai

खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरल्याचे घटना नुकतीच घडली आहे. या अपघातात कोणती जीवित हानी झालेली नाही.

पण या घटनेमुळे बेलापूरकडून खार कोपरला जाणारी आणि खार कोपर वरून नेरूळ बेलापूर कडे जाणारी लोकल सेवा मात्र बंद करण्यात आली आहे. पाहूया हा अपघाताचा व्हिडिओ..

तसेच याचा मुख्य मार्गावर म्हणजे मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या घटनेबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी 8:46 वाजता बेलापूर ते खारकोपर धावणाऱ्या लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले. कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही.

लोकल पुन्हा रुळावर आणण्यासाठी मदत गाड्या घटनास्थळाकडे रवाना झालेले आहेत. हार्बर मार्गावरील रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत
एमडी टीव्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here