ग्रँड रोडमध्ये चाळीत थरार..

0
145

मुंबई :२७/३/२३

मुंबईतील ग्रँड रोड मध्ये एका माथेफिरूने शेजारी राहत असलेल्या पाच जणांवर हल्ला केलाय.. या घटनेने एकच खळबळ माजलीये..

हल्लेखोर माथेफिरू च नाव आहे चेतन गाला..

त्याने पाच जणांना चाकूने भुसकले आहे…

शेजारी माझ्या घरच्यांना भडकवतात म्हणून रागाच्या भरात पाच जणांवर चाकू हल्ला केला..

या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झालाय..

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चेतना अटक केली..

स्वतःचे कुटुंब सोडून गेल्यामुळे आरोपीने मानसिक तणावामुळे आणि रागाच्या भरात हा हल्ला केला.. शेजारी माझ्या कुटुंबीयांना भडकवत होते असे म्हणत चेतन्याने चाकू हल्ला केला पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत..

जयेश मेस्त्री आणि नीला मेस्त्री अशी दोन्ही मृत पती-पत्नींची नावं आहेत…

डॉक्टर दाभ मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये आरोपी चेतनगाला राहतो..

54 वर्षीय चेतन्याने आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हातातील चाकूने शेजारी राहणाऱ्या लोकांवर प्राण घातक हल्ला केल्याची घटना समोर आली..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जणांवर एच एन रिलायन्स हॉस्पिटल तसेच नायर रुग्णालयामध्ये पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे..

जयेश आणि इला यांच्यासह प्रकाश वाघमारे स्नेहल ब्रह्मभट्ट आणि तिची मुलगी जेनी असे हल्ला झालेल्या पाच जणांची नावं आहेत…

आरोपीला ताब्यात घेतली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे
अल्पेश पटेल ,मुंबई प्रतिनिधी, एम.डी. टी.व्ही. न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here