Today Nashik News :  सातपूरमधील एका कंपनीतील तीन कामगार ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्युमुखी…!

0
223
Today Nashik News company three workers died of cardiac arrest
सातपूर ( Satpur )  येथील एका कंपनीतील तीन कामगारांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने दोन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कंपनीतील कामगार आणि अधिकारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.

Today Nashik News : सातपूर येथील एका कंपनीतील तीन कामगारांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने दोन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कंपनीतील कामगार आणि अधिकारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कंपनीच्या पेंटशॉप विभागातील कामगार प्रकाश बाळासाहेब जाधव (वय ४५ ,रा. अमृतधाम, पंचवटी) यांचे ह्रदयविकाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. ते मायको कंपनीतील निवृत्त कामगार बाळासाहेब जाधव यांचे पुत्र व महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील कार्मिक व्यवस्थापन विभागातील कर्मचारी नीलेश जाधव यांचे बंधू होत.( Today Nashik News )

तर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी बॉडीशॉप विभागातील कामगार भागचंद चिला खैरनार (वय ५७) यांचे निधन झाले. दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांना अचानक ह्रदयविकाराचा जोरदार झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. खैरनार यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगावी पाटणे (ता. मालेगाव) येथे झाला.

तिसरे कामगार दीपक अनिल तळेले (वय ३५, रा. कामठवाडे) यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्याने ते मित्रासोबत तातडीने त्रिमूर्ती चौकातील खासगी दवाखान्यामध्ये लिफ्टने जातानाच त्यांचाही ह्रदयविकाराचा जोरदार झटका आल्याने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व चौथीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे. तळेले यांचा अंत्यविधी मोरवाडी येथील अमरधाममध्ये करण्यात आला. प्रसंगी कंपनीतील कामगारांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे कंपनीतील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीने कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here